श्री विद्यमान विकास मंडळ, अडूर यांच्या वतीने आयोजन
गुहागर, ता. 29 : तालुक्यातील अडूर येथील श्री विद्यमान विकास मंडळ अडूर (मधलीवाडी) च्या वतीने त्रैवार्षिकप्रमाणे याही वर्षी मंगळवार दि. ०१ एप्रिल २०२५ रोजी श्री सत्यनारायणाची महापुजा व हळदी-कुंकु समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे यंदाचे हे ३८ वे वर्ष आहे. यानिमित्ताने जिल्हास्तरीय निमंत्रित ग्रुप डान्स स्पर्धा २०२५ संपन्न होणार आहेत. Group Dance Competition at Adur


या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांक रोख रक्कम १२०००/- व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक रोख रक्कम ८८००/- व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक रोख रक्कम ५५५५/- व आकर्षक चषक असे असणार आहे. Group Dance Competition at Adur
यावेळी मंगळवार दि.०१ एप्रिल रोजी सकाळी १० वा. श्री सत्यनारायणाची महापुजा व आरती, दुपारी २.३० वा. महिला मंडळ हळदी कुंकु समारंभ तसेच रात्रौ ९ वा. विशेष कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय निमंत्रित ग्रुप डान्स स्पर्धा इत्यादी कार्यक्रम पार पडतील. तरी यावेळी आपण सर्वांनी श्रींच्या तिर्थ प्रसादाचा लाभ घेऊन या मंगल धार्मिक सोहळ्याची व सांस्कृतिक कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री विद्यमान विकास ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर मंडळ व महिला मंडळ, अडूरच्या वतीने करण्यात आले आहे. Group Dance Competition at Adur