गुहागर तालुक्यातील वरवेली गावची सुकन्या
गुहागर, ता. 01 : हिंदवी स्वराज्याचे कारागृह अशी ओळख असलेला किल्ले लिंगाणा किल्ला गुहागर तालुक्यातील वरवेली मराठवाडीची सुकन्या कु. ग्रिहिथा सचिन विचारे हीने अनोख्या पद्धतीने लिंगाणा किल्ला सर केला आहे. सर्वात कमी वयात प्रथमच १००० फूट झिपलींग करून ग्रिहिथालीने एक विक्रम रचला आहे. Grihitha Vichare climbed the Lingana fort
नाताळची सुट्टी म्हटलं तर मुलांना आवडत ते खेळणे, बाहेर फिरायला जाणे आणि खुप मज्जा करणे. महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळख असलेली ठाण्याची कुमारी ग्रिहिथा सचिन विचारे (९ वर्ष) हिने नाताळच्या सुट्टीची सुरुवात एका अनोख्या पद्धतीने केली आहे. ग्रिहिथा हिने आजवर तर जगातील ऊंच पर्वत सर केली आहेत. ग्रिहिथाने वयाच्या ७ व्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वात ऊंच कळसूबाई शिखर, आठव्या वर्षी नेपाळ मधला माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि नवव्या वर्षी जगातील सर्वात उंच शिखर (stand alone mountain) टांझानिया येथील माउंट किलीमांजारो सर केला आहे. Grihitha Vichare climbed the Lingana fort
महाराष्ट्रातील चढाईसाठी अति कठीण मानले जाणारे काही गड किल्ले व सुळके (मोरोशीचा भैरवगड, मल्लंगड, तैल बैला, हरिहर, वजीर सुळका, नवरा नवरी सुळके इत्यादी) देखील ग्रिहिथाने सर केले आहेत. ग्रिहिथाच्या आजवरच्या यशामध्ये अजून एका कामगिरीची भर पडली आहे आणि ती म्हणजे, हिंदवी स्वराज्याचे कारागृह अशी ओळख असलेला किल्ले लिंगाणा ग्रिहिथाने दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी सर केला. Grihitha Vichare climbed the Lingana fort

लिंगाणा हा चढाईस अतिशय कठिण, दमछाक करणारा व अवघड श्रेणीत गणला जाणारा किल्ला असला तरी ग्रिहिथाने एका अनोख्या पध्दतीने हा किल्ला सर केला. ग्रिहिथाने सकाळी लवकर, मोहरी या बेस कॅम्प पासून सुमारे एक दीड तासाची पायपीट करून रायलिंग पठार गाठले. रायलिंग पठारावरुन सुमारे १५०० – २००० हजार फूट खोल दरी वर महाराष्ट्राचे आज वरची सर्वात लांब, म्हणजेच, सुमारे १००० फूट लांबीच्या झिपलिंग करून लिंगणाचा पायथा गाठला. त्यापुढे गिरियारोहणासाठी लागणारे सर्व साहित्य परिधान करून चढाई सुरु केली. सुमारे तीन तासांच्या कठीण चढाई नंतर ग्रिहिथाने किल्ल्याचा टॉप गाठला. Grihitha Vichare climbed the Lingana fort
अनोख्या पद्धतीने लिंगणा सर करणे व सर्वात कमी वयात प्रथमच १००० फूट झिपलिंगकरून ग्रिहिथाने नवा विक्रम रचला आहे. या पूर्ण मोहिमेची अजून एक विशेष बाब म्हणजे ग्रिहिथाने तिच्या नेहमीच्या स्टाईलने ही पूर्ण मोहीम पारंपरिक नऊवारी साडी नेसून पार पडली. मोहिमेत ग्रिहिथाला सर्व तांत्रिक साहित्य, मोलाचं मार्गदर्शन व सहकार्य केले ते अडव्हेंचर ट्रेकर्सचे आयाजोन करणारे महादुर्ग अक्षय जमदारे, ऋषिकेश बापरडेकर, कल्पेश बनोटे, नितेश पाटील, खुषल बेंद्रे, वैभव मंचेकर व लिव्हिंग अडव्हेंचरच्या अनंता मर्गले, सूरज नेवासे, अमोल तळेकर, श्रीनाथ पवार, कृष्णा मर्गले या टीमने सहकार्य केले. Grihitha Vichare climbed the Lingana fort
