रत्नागिरी, ता. 01 : देव, घैसास, कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये इतिहास विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. तसेच विद्यार्थ्यांना टिळक जन्मस्थान स्मारकात जाऊन टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. Greetings to Lokmanya Tilak from Dev College
यानिमित्त वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत इतिहास विभाग प्रमुख प्रा. मंदार बेटकर यांनी केले. टिळकांच्या जीवनातील मंडालेच्या तुरुंगातील प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडला. भारत स्वतंत्र होण्यासाठी त्यांचा संघर्ष किती मोलाचा आहे हे समजावून सांगितले. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राची बोंबले (प्रथम वर्ष वाणिज्य), द्वितीय अश्विनी करमरकर (प्रथम वर्ष वाणिज्य), तृतीय आमिषा मडके (द्वितीय वर्ष वाणिज्य) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. सूत्रसंचालन योगिनी बापट हिने केले. दिव्या निळे हिने आभार मानले. Greetings to Lokmanya Tilak from Dev College