देवस्थान तर्फे सांस्कृतिक, कला, क्रीडा जोपासण्याचे काम करतात – नगराध्यक्ष बेंडल
गुहागर, ता. 21 : गुहागरच्या पोलीस परेड मैदानावर तीन दिवस चालणाऱ्या श्री देव व्याडेश्र्वर देवस्थानच्या महाशिवरात्री उत्सावानिमित्त आयोजित व्याडेश्र्वर महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. Great start of Vyadeshwar festival


यावेळी बोलताना नगराध्यक्ष बेंडल म्हणाले की, देवस्थान तर्फे महाशिवरात्रीनिमित्ताने तीन दिवसाचा हा महोत्सव गुहागर नगरीमध्ये होत आहे. अत्यंत निसर्गरम्य असे आपले शहर आहे. आणि तालुका सुद्धा. पश्चिमेला आपला समुद्र आणि पूर्वेला डोंगर यांच्या मधल्या भागामध्ये वसलेले शहर आहे. तितकीच प्रेमळ आणि चांगली माणसे शहरांमध्ये आहेत. आपली संस्कृती, परंपरा जपणारी माणसं आहेत.


ग्रामीण भागातील कलाकारांना त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावं आणि आपली संस्कृती, परंपरा जोपासण्याचे काम हे देवस्थान करत आहे. गुहागरमध्ये गणपती, शिवरात्र असूदे किंवा दिवाळी, दसरा, शिमगा या सगळ्या सणांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा आयोजन केले जाते. ही परंपरा अखंडीतपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे. या नगरीचा नगराध्यक्ष म्हणून राजकारण बाजूला ठेऊन प्राधान्यक्रमाने गुहागरच्या विकासासाठी कट्टीबद्ध असल्याचे श्री. बेंडल यांनी सांगितले. Great start of Vyadeshwar festival


यावेळी पद्मश्री पुरस्कार विजेते दादा इदाते, श्री दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे, देव व्याडेश्र्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दुल भावे, खजिनदार सर्वेश भावे, सचिव प्रथमेश दामले, विश्वस्त प्रकाश भावे, संदीप बारटक्के, सिध्दीविनायक जाधव, मयुरेश आठवले, श्रीधर आठवले, गजानन मोरे, अभिजीत भिडे, हेमंत बारटक्के, सचिन मुसळे, मनीष कामेरकर, केदार खरे, माजी अध्यक्ष अरुण परचुरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वरंडे, दिपक देवकर, कृपाल परचुरे यांनी केले. Great start of Vyadeshwar festival