• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अल्पसंख्याक शाळांना मिळणार अनुदान

by Manoj Bavdhankar
June 10, 2023
in Maharashtra
213 2
0
Grants will be given to minority schools
418
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना

रत्नागिरी, ता. 09 : जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांच्याकडून पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेंतर्गत कमाल रु. 2  लाख अनुदानाचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. Grants will be given to minority schools

या योजनेच्या अटी व शर्ती 

अल्पसंख्याक समाजाचे (मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी व ज्यू) किमान ७० टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. शासन मान्यता प्राप्त अपंगाच्या शाळांमध्ये किमान ५० टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. महा नगरपालिका व जिल्हापरिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधीपत्याखाली चालविण्यात येत असलेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये व अपंग शाळा या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. यापुर्वी या योजनेंतर्गत ५ वेळा अनुदान प्राप्त केलेल्या शाळा / संस्था अनुदानासाठी पात्र ठरणार नाहीत. एकाच इमारतीत / आवारात एकाच संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा वेगवेगळया शाळा/महाविदयालये/ हे दिवसभरातील स्वतंत्र वेळापत्रकानुसार वेगवेगळ्या पाळीत/सत्रात भरत असतील आणि त्यांचे DIES CODE वेगवेगळे असतील अशा परिस्थितीत त्या इमारतीसाठी/ आवारासाठी या DIES CODE पैकी फक्त् एकाच DIES CODE साठी अनुदान मंजूर करण्यात येईल. कनिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या अभ्यासक्रमाच्या समकक्ष दर्जा देण्यात आलेले अभ्यासक्रम चालविणा-या शाळा व व्यावसायिक शिक्षण संस्था तसेच स्वयं- अर्थसहाय्यीत शाळा या योजनेंतर्गत अनुदानासाठी पात्र असणार नाहीत. Grants will be given to minority schools

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत देण्यात आलेला आहे. त्यानुसार पात्र मदरासांनी आपले प्रस्ताव दिनांक ३० जून, २०२३ पूर्वी विहित मुदतीत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन समिती विभागाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी, रत्नागिरी यांनी केले. Grants will be given to minority schools

Tags: Grants will be given to minority schoolsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share167SendTweet105
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.