सागरी मच्छीमार संघटनेच्यावतीने सहाव्या वर्धापन दिनानिमित्त
गुहागर, ता. 28 : शनिवार दि. 23 जुलै रोजी भव्य मच्छीमार मेळावा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यकम सागरी मच्छीमार संघटना महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात आला. तांडेल – खलाशी- मालक यांमध्ये समन्वय साधत मच्छीमारांच्या न्यायहक्क व विकासासाठी ही संघटना झटत असते. रत्नागिरी मधील खारवी समाज भवन मध्ये झालेल्या या समारंभाचे अध्यक्षस्थान श्री. लिओ कोलासो यांनी भूषविले. Grand Fisherman’s Gathering

यावेळी जेष्ठ रंगकर्मी गोल्ड मेडलिस्ट श्री. राम सारंग, प्रा डाॕ. श्री.सुहास वासावे, अॕडव्होकेट सौ. अनघा अभय लाकडे, वैद्यकिय परिक्षा उत्तीर्ण केलेले डाॕ. शिवम पालशेतकर, डाॕ. श्रेयसी पटेकर, चित्रकलेतील राष्ट्रीय स्पर्धेतील विजेते प्रा. निलेश पावसकर यांना त्यांच्या विशेष नैपुण्याबद्दल सन्मानित करण्यात आले. वासुदेव वाघे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संघटनेचे संचालक संजय पावसकर यांनी मच्छीमारांच्या व्यथा व्यासपीठासमोर मांडल्या. यावेळी सुधीर वासावे, संतोष पावरी यांनी आपल्या मनोगतातून संघटना आणि सहकाराची शक्ती याबाबत मार्गदर्शन करताना मच्छीमारांच्या आर्थिक संकटात उभारी देण्यासाठी आपली पतसंस्था खंबीरपणे पाठीशी उभी आहे, असा विश्वास दिला. प्रा. डाॕ. सुहास वासावे सरांनी मच्छीमार बंधु भगिनींशी संवाद साधत आपल्या न्यायहक्क आणि मच्छीमार संस्थामार्फत होणाऱ्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा. याबाबतचा उहापोह केला. Grand Fisherman’s Gathering

संघटनेचे उपाध्यक्ष आणि जि. प. सदस्य श्री, महेश नाटेकर यांनी मच्छीमारांचे प्रश्न आणि त्यासाठी शासन स्तरावरील लढा याबाबत विस्तृतपणे लेखाजोखा मांडताना किनाऱ्यावरील जमीनीचा मालकी हक्क, डिझेल परतावा, मच्छीमार दाखला, विविध बंदरावरील छोट्या छोट्या जेटींची निर्मिती, स्थानिक मच्छीमार विद्यार्थ्याना विविध प्रकल्पामध्ये ट्रेनिंगसहित सामावुन घेणे, मत्स्य दुष्काळ, आपघाती विमा ई. अनेक प्रश्नांची उकल होण्यासाठी संघटना सक्षम करणे, गरजेचे असल्याचे मत मांडले. संघटनेचे अध्यक्ष श्री. दामोदर लोकरे यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत करीत कृती समितीच्या माध्यमातुन आपल्या संघटनेच्या मच्छीमार सभासदांना न्याय मिळण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. तांडेल, खलाशी व मालक वर्गामध्ये समन्वय साधण्यासाठी आपली संघटना सहा वर्ष प्रयत्न करीत आहे. आणि म्हणुनच याबाबतीत यापूर्वी होत असलेले अत्याचार, खलाशी, तांडेल मालकामंधील कलह यामध्ये आता घट झाल्याचे दिसुन येते. हे संघटनेच्या एकजुटीचे फलित आहे. त्याचप्रमाणे सभासदाना अपघाती विमा 2 लाख वरुन 5 लाख मिळवुन देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातुन झालेले प्रयत्न सर्वासमोर ठेवताना संघटन ही काळाची गरज का आहे, हे आपल्या मनोगतातुन मांडले. Grand Fisherman’s Gathering
कृती समितीचे सरचिटणीस श्री. किरण कोळी यांनी अत्यंत दिलखुलासपणे सभेला संबोधित करताना मच्छीमारांचे मूळ प्रश्न, यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि तळकोकणमधील विभागानुसार चालणारी मच्छीमारी आणि तिथल्या समस्या आणि त्यासाठी शासन स्तरावर देत असलेला लढा यांचे विस्तृत विवेचन केले. कार्याध्यक्ष श्री. रामकृष्ण तांडेल यांनी मेळाव्यास उपस्थित असलेल्या उत्स्फुर्त जनसमुदायाचे कौतुक करत सागरी संघटनेला सोबत घेवुन आपल्या समस्यांच्या निवारणासाठी कृती समिती आपल्या पाठीशी उभी राहील असे अभिवचन दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. लिओ कोलासो यांनी सागरी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष दामोदर लोकरे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखालील या संघटनेच्या कार्यकर्त्यांची मच्छीमारांच्या प्रगतीसाठीची तळमळ या मेळाव्याच्या माध्यमातुन प्रकर्षाने दिसुन येते. हे मनोगतातुन मांडताना तळागाळातील मच्छीमारांचे विविध प्रश्न जे या संघटनेच्या माध्यमातुन आपल्यापर्यत आले आहेत, त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचा विश्वास त्यांनी दिला. यासाठी राज्य व केंद्रस्तरावरही लढा दिला जाईल असे आश्वासान कोलासो यांनी दिले. यावेळी नुकतेच निधन पावलेले संघटनेचे क्रियाशील सभासद कै. राकेश आंबेरकर यांच्या कुटुंबियांसाठी तात्काळ निधीचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते गाव कमिटीकडे सुपुर्द केला गेला. Grand Fisherman’s Gathering

या कार्यक्रमाला महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती कार्याध्यक्ष श्री. रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस श्री, किरण कोळी, सागरी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष श्री. दामोदर लोकरे, उपाध्यक्ष व जि. प सदस्य श्री. महेश नाटेकर, सचिव श्री, विवेक खडपे, खजिनदार श्री. मुश्ताक मुकादम, सल्लागार श्री. भगवान खडपे, खारवी समाज पतसंस्था अध्यक्ष श्री. संतोष पावरी, उपाध्यक्ष श्री. सुधीर वासावे, सामाजिक नेते श्री. राजु भाटलेकर, समाजसेवक श्री. पुरुषोत्तम आंब्रे, जेष्ट रंगकर्मी श्री, राम सारंग, जिल्हा मच्छीमार संघाच्या संचालक सौ. वैशाली खडपे, संघटनेच्या कोअर कमिटीचे संचालक श्री. संजय पावसकर, नारायण बुवा मिरजुळकर, नरेश आंबेरकर, संतोष लाकडे, गाव कमिटीचे संजय डोर्लेकर, रोहिदास आडिवरेकर, नितीन साखरकर, नामदेव शिरगावकर, प्रकाश लोकरे, दिलिप हरचकर, मेघनाथ वरवटकर, संजय आडिवरेकर, मंगेश आडविरकर, लक्ष्मण सारंग आदींसह मच्छीमार प्रतिनिधी, सर्व गाव कमिटीच्या महिला मंडळ प्रतिनिधी आणि असंख्य मच्छीमार उपस्थित होते. या संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आपल्या योगेश खडपे यांनी केले. Grand Fisherman’s Gathering