गुहागर, ता. 13 गुहागर न्यूज, निसर्गयात्री संस्था तसेच जिल्ह्यातील अन्य निसर्गप्रेमी संस्था व रत्नागिरी जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील सड्यांवरील जीवनचक्राविषयी अनोखी स्पर्धा घेण्यात येत आहे. यामध्ये छायाचित्र स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, त्रिमिती स्पर्धा, निबंध स्पर्धा व काव्य स्पर्धा यांचा समावेश आहे. ही स्पर्धा आठवी ते दहावी गट, महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा तीन गटात होणार आहे. स्पर्धेसाठी आपले छायाचित्र/ चित्र/ निबंध/काव्य/ मॉडेल पाठविण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर २०२२ पर्यंत आहे. Grand competition
स्पर्धेविषयी थोडेसे
आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला खूप मोठी भौगोलिक विविधता लाभली आहे. त्यातील एक अत्यंत महत्वपूर्ण भूभाग म्हणजे स्थानिक भाषेत ओळखला जाणारा सडा. (माळरान) जांभा दगडांच्या या सड्यावर विविध हंगामात वेगवेगळे जीवनचक्र दिसून येते. उदा. श्रावणात हे सडे हिरवेगार होतात. नवरात्रा दरम्यान रंगीबेरंगी फुले सड्याला (माळरान) अधिक मोहक बनवितात. सड्यावरती आपल्या पूर्वजांनी रेखाटलेली कातळ शिल्पे आढळतात. या सड्यांचे असे अनेक पैलू आश्चर्यकारक आहेत म्हंटले तरी वावगे ठरू नये. खरेतर हे सडे आपल्या दैनंदिन जीवनाशी अत्यंत जवळून जोडले गेले आहेत. त्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे पण आज दुर्लक्षित आहे. Grand competition
सडा या भुभागाची माहिती सर्वांना व्हावी, त्याचे विविधांगी महत्व सर्वांना व्हावे, सर्वजण या भुभागाशी परत एकदा जोडले जावेत यासाठी एक प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठी सडा आणि त्याचे विविध पैलू आपल्या छायाचित्राच्या, चित्रकलेच्या तर निबंध आणि काव्याच्या माध्यमातून तसेच मॉडेलच्या माध्यमातून जगासमोर आणण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. Grand competition
स्पधेचे विषय
1) सडा परिसर ( lateritic Plateau Landscape )
2) सड्यावरील जैवविविधता (सड्यांवरील वनस्पती/ प्राणी/ वनस्पती आणि प्राणी यांच्यातील सहसंबंध ) (Biodiversity on lateritic Plateau – Plants/ Animals / Plant – Animal interaction like pollination)
3) सडा आणि माणूस (सडा परिसराचे सामाजिक, सांस्कृतिक पैलू) ( lateritic Plateau & People – Social and Cultural aspects of lateritic Plateau )
4) सडा आणि परिसराचे त्रिमिती मॉडेल (दिवाळीतील किल्यांसारखे) आपले गाव, सडा, पाणवठे, देऊळ, देवराई, सामाजिक आणि सांकृतिक पैलू यांसह (3D Model of lateritic Plateau Landscape* – showing various features like village, shrines, water bodies, vegetation, sacred groves, Social and Cultural aspects of lateritic Plateau ect.)
5) निबंध आणि काव्य – विषय – सडा आमची श्रीमांती (कोंकणातील जांभा खडकांचे सडे त्याचे विविध पैलू यावर आधारित निबंध आणि काव्य) Grand competition
नियम व अटी
छायाचित्र स्पर्धा
प्रत्येक गटात प्रत्येक विषयाला पहिल्या तीन क्रमांकांना रोख रक्कम + प्रमाणपत्र + मानचिन्ह
विषय – सडा परिसर, सड्यावरील जैवविविधता, सडा आणि माणूस
नियम –
छायाचित्र स्वतः काढलेले असावे.
छायाचित्रमध्ये विषयाशी छेडछाड असू नये.
छायाचित्र कुठल्याही सिझन मधील तसेच पूर्वी काढले असले तरी चालणार आहे. फक्त तसे नमूद करणे बंधनकारक.
छायाचित्र 12 “ x 18 ” साईज मध्ये प्रिंट व डीजीटल ( 300 dpi ) या दोन्ही प्रकारे स्पर्धेसाठी देणे बंधनकारक.
छायाचित्रला 1/2 “ जाडीची सर्व बाजूने पांढऱ्या रंगाची बोर्डर असणे आवश्यक.
छायाचित्रावर कोणताही तपशील / नाव टाकलेले नसावे.
छायाचित्राच्या मागे स्वतःचे नाव व संपर्क क्र. लिहणे आवश्यक.
स्पर्धेचे छायाचित्र सोबत दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये अपलोड करावे तसेच प्रिंट संबंधित माहितीसह नमुद केलेल्या पत्त्यावर पाठवावी.
बक्षिसे –
प्रत्येक गटात प्रत्येक विषयाला पहिल्या तीन क्रमांकांना रोख रक्कम + प्रमाणपत्र + मानचिन्ह
प्रत्येक गटात प्रत्येक विषयाला 10 उत्तेजनार्थ प्रमाणपत्र
विशेष सहभाग नोंदवणार्या शाळा आणि महाविद्यालये यांना विशेष बक्षिस ( तालुका पातळीवर निवड )
चित्रकला स्पर्धा
विषय – सडा परिसर, सड्यावरील जैवविविधता, सडा आणि माणूस
नियम –
चित्र कागदाचा आकार 11” x 15” मध्येच असावे.
रंग माध्यम कोणतेही.
चित्र रचना स्वनिर्मित असावी.
चित्राच्या मागे स्वतःचे नाव व संपर्क क्र. लिहणे आवश्यक.
स्पर्धेचे चित्र सोबत दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये अपलोड करावे तसेच प्रिंट संबंधित माहितीसह नमुद केलेल्या पत्त्यावर पाठवावी.
बक्षिसे –
प्रत्येक गटात प्रत्येक विषयाला पहिल्या तीन क्रमांकांना रोख रक्कम + प्रमाणपत्र + मानचिन्ह
प्रत्येक गटात प्रत्येक विषयाला 10 उत्तेजनार्थ प्रमाणपत्र
विशेष सहभाग नोंदवणार्या शाळा आणि महाविद्यालये यांना विशेष बक्षिस ( तालुका पातळीवर निवड )
त्रिमिती मॉडेल
विषय – भूगोल विषयाशी संबंधित महाविद्यालयीन विद्यार्थी वर्गापुरती मर्यादित
नियम –
निर्मिती 6 फुट x 6 फुट आकारामध्ये असावी.
निर्मितीसाठी थर्माकोल / प्लॅस्टिक इत्यादी हानिकारक गोष्टींचा वापर करू नये.
मॉडेल एका ठिकाणाहून दुसरीकडे हिलविणे सहज शक्य व्हावे असे असावे.
निबंध स्पर्धा
विषय – सडा आमची श्रीमंती
नियम –
निबंधासाठी 1500 ते 2000 शब्द मर्यादा.
निबंध स्वतः तयार केलेला असावा.
स्पर्धेच्या निबंधाचे छायाचित्र सोबत दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये अपलोड करावे तसेच प्रिंट संबंधित माहितीसह नमुद केलेल्या पत्त्यावर पाठवावी. बक्षिसे –
प्रत्येक गटात प्रत्येक विषयाला पहिल्या तीन क्रमांकांना रोख रक्कम + प्रमाणपत्र + मानचिन्ह
प्रत्येक गटात प्रत्येक विषयाला 10 उत्तेजनार्थ प्रमाणपत्र
विशेष सहभाग नोंदवणाऱ्या शाळा आणि महाविद्यालये यांना विशेष बक्षिसे ( तालुका पातळीवर निवड )
काव्य स्पर्धा
विषय – सडा आमची श्रीमंती
नियम –
(सडा) काव्य स्वरचित असावे.
स्पर्धेचे काव्य सोबत दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये अपलोड करावे तसेच प्रिंट संबंधित माहितीसह नमुद केलेल्या पत्त्यावर पाठवावी.
बक्षिसे –
प्रत्येक गटात प्रत्येक विषयाला पहिल्या तीन क्रमांकांना रोख रक्कम + प्रमाणपत्र + मानचिन्ह
प्रत्येक गटात प्रत्येक विषयाला 10 उत्तेजनार्थ प्रमाणपत्र
विशेष सहभाग नोंदवणार्या शाळा आणि महाविद्यालये यांना विशेष बक्षिस ( तालुका पातळीवर निवड ) Grand competition स्पर्धेतील सर्व छायाचित्र / चित्र / निबंध / मॉडेल यांचा भवितव्यात विविध कारणांसाठी वापर स्पर्धकांच्या नावासहित निसर्गयात्री संस्था, जिल्हा प्रशासन यांना करण्यास स्पर्धकाची कोणतीही हरकत असणार नाही. स्पर्धेसंदर्भात सर्व हक्क संस्थेच्या स्वाधीन राहतील. अधिक माहितीसाठी चिन्मय ओक, गुहागर ( 942213002), मयुरेश पाटणकर ( 9423048230) या नंबरवर संपर्क साधावा. Grand competition
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबतच्या गुगल लिंकचा वापर करा.
https://forms.gle/77jJhAAADi7wXZcB9