अंजनवेल ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन
गुहागर, ता. 18 : अंजनवेल येथील आंतरराष्ट्रीय शाळेला वहातुक व्यवस्था पुरवणे, आवश्यक पाणी पुरवठा करणे, वीजपुरवठ्याची व्यवस्था करणे या विषयांमध्ये ग्रामपंचायत अंजनवेल शाळेची पर्यायाने मुलांची अडवणूक करत आहे. याची गंभीर दखल घेवून तत्काळ चौकशी करावी. असे निवेदन अंजनवेल मधील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, गुहागर यांना दिले आहे. Gram Panchayat is obstructing the school

ग्रामपंचायत अंजनवेलने आर्थिक व्यवहार पूर्ण न केल्याने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेच्या तीन स्कुलबस ठेकेदाराने स्वत:च्या ताब्यात ठेवल्या होत्या. या स्कुलबस ग्रामपंचायतीने परत घ्याव्यात यासाठी मार्च 2023 मध्ये सलग 15 दिवस ग्रामस्थांनी अंजनवेल ग्रामपंचायतीसमोर आंदोलन केले होते. यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी यशस्वी मध्यस्थी केली. गटविकास अधिकारी केलेल्या सूचनांप्रमाणे ठेकेदाराने तीन पैकी दोन स्कुलबस ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिल्या. सदर स्कुलबस चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय शाळेच्या व्यवस्थापन समितीकडे सोपविण्याचा ठराव 29 मार्च 2023 च्या ग्रामसभेमध्ये सर्वांच्या संमतीने मंजुर झाला. मात्र याबाबतची कार्यवाही ग्रामपंचायतीने केलीच नाही. आज नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय शाळेत मुलांना आणण्यासाठी स्कूलबस उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. Gram Panchayat is obstructing the school

या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद आदर्श आंतरराष्ट्रीय शाळेतील मुलांना कोणत्या सुविधा उपलब्ध असाव्यात त्याचे निकष शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2020/प्र. क. 143/एस.डी.-6, दिनांक 5 मार्च 2021 मध्ये दिले आहे. यामध्ये परिसरातील शाळेत प्रवेशीत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षीत वहातुक व्यवस्था उपलब्ध करण्याचे नमुद आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी ग्रामपंचायतीकडून स्कुलबस ताब्यात घेण्याचे अनेक प्रयत्न शाळा व्यवस्थापन समितीने केले. परंतु या स्कुलबसचे कागदपत्र मिळत नसल्याने स्कुलबस शाळा व्यवस्थापन समितीच्या ताब्यात देता येत नाहीत. असे उत्तर सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. शाळेतील मुलांसाठी दररोज मुबलक पाणीपुरवठा करणे, शाळेसाठी वीजपुरवठा व्यवस्था करणे व आदर्श आंतरराष्ट्रीय शाळेच्या धोरणाप्रमाणे सुरक्षित वहातुक व्यवस्था पुरविणे या तिन्ही विषयात ग्रामपंचायत अंजनवेल शाळेची पर्यायाने मुलांची मोठ्या प्रमाणात अडवणूक करीत आहे. स्कुलबसचे कागदपत्र ग्रामपंचायत कार्यालयात मिळत नाहीत किंवा गहाळ झालेत असे सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगणे ही अतिशय गंभीर बाब आहे. असेच चालु राहील्यास आंतरराष्ट्रीय शाळेची पटसंख्या कमी व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे संबधित विषयात तत्काळ लक्ष घालुन चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. Gram Panchayat is obstructing the school
या निवेदनावर अंजनवेलचे माजी सरपंच आत्माराम मोरे, यशवंत बाईत, विजय मिशाळ, दत्ताराम पड्याळ आदी 24 ग्रामस्थांच्या सह्या आहेत. सदरचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देते वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर आदी उपस्थित होते. Gram Panchayat is obstructing the school
