विजय तेलगडे, काम कोणाला द्यायचे हा आमचा अधिकार
गुहागर, ता. 04 : कोणत्या ठेकेदाराला काम द्यायचे हा अधिकार सर्वस्वी ग्रामपंचायतीचा आहे. तसे आम्ही निविदा प्रसिध्द करताना नमुद केले होते. त्याचबरोबर पाटपन्हाळेमधील ग्रामसभेत काही ठेकेदाराना काम देऊ नये असा ठराव ग्रामस्थांनी एकमताने केला आहे. या पार्श्र्वभुमीवर आम्ही एका ठेकेदाराला दर कमी असतानाही काम नाकारले. अशी माहिती पाटपन्हाळेचे सरपंच विजय तेलगडे यांनी दिली. Gram Panchayat has the right to give work to whom
नागरी सुविधेअंतर्गत दोन कामांचे दर कमी असुनही पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने मोहन चव्हाण यांनी निविदा नाकारली. यासंदर्भात बोलताना सरपंच तेलगडे म्हणाले की, मी सरपंच होण्यापूर्वी संबंधित ठेकेदार करत असलेल्या कामाबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी होत्या. सरपंच झाल्यावर या तक्रारी सोडविण्यासाठी, वस्तुस्थिती समजुन घेण्यासाठी ग्रामस्थ, अधिकारी, ठेकेदार व ग्रामपंचायत अशी एकत्र कामाची पहाणी करत होतो. त्यावेळी संबंधित ठेकेदाराचे एकूण वागणे ग्रामस्थांना आवडले नाही. याच ग्रामस्थांनी पुढे ग्रामसभेमध्ये या ठेकेदाराला काम देवू नये असा ठराव एकमताने केला. सदर ठरावाची प्रत गटविकास अधिकारी, पंचायत समिती गुहागर यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर मार्फत बांधकाम विभागाकडे देणे आम्हाला सहज शक्य होते. मात्र सदरच्या शासकीय ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकून त्याच्या व्यवसायावर परिणाम व्हावा. अशी आमची इच्छा नव्हती. म्हणून पुढची प्रक्रिया आम्ही केली नाही. Gram Panchayat has the right to give work to whom
दरम्यान नागरी सुविधेमधुन दोन कामांची निविदा आम्ही प्रसिध्द केली. त्यावेळी कोणत्याही ठेकेदाराला नाकारण्याचा अधिकार ग्रामपंचायतीने राखून ठेवला आहे. हे वाक्य आम्ही प्रसिध्द केले होते. तरीही संबंधित ठेकेदाराने निविदा भरली. वास्तविक पाटपन्हाळे कार्यक्षेत्रात काम करु नये असे जुजबी बोलणे झालेले असताना निविदाच भरली नसती तर हा मुद्दाच आला नसता. तरीही आम्ही तटस्थपणे निविदा स्विकारली. ठेकेदाराने सर्वात कमी दर नमुद केले होते. मात्र निकृष्ट दर्जाचे कामाचा आरोप, ग्रामस्थांचा ग्रामसभेतील ठराव या पार्श्र्वभुमीवर त्या दरात गुणवत्तापूर्ण काम होईल का याबाबत सर्वजण साशंक होते. म्हणून आम्ही अन्य ठेकेदाराला काम दिले. Gram Panchayat has the right to give work to whom
आज संबंधित ठेकेदार ज्या पध्दतीने पत्र व्यवहार करत आहे ते करण्याची आवश्यकता आहे. असे आम्हाला वाटत नाही. आम्ही प्रसिध्द केलेल्या निविदेमध्येच त्यांच्या प्रश्र्नांची सर्व उत्तरे मिळून जातील. म्हणून वाद न वाढविता आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. यासंबंधी शासनाकडून विचारणा झाली तर त्याची उत्तरे देण्यास आम्ही सक्षम आहोत. Gram Panchayat has the right to give work to whom