• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरातील 26 ग्रा.पं.च्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

by Ganesh Dhanawade
August 24, 2022
in Guhagar
16 0
0
Konkan Teachers Constituency Election
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पाच ग्रापंचायतीवर प्रशासक राज ; ग्राम विकास ठप्प

गुहागर, ता. 24  : गुहागर तालुक्यातील 63 पैकी पांच ग्रामपंचायतीची मुदत संपून दिड वर्ष उलटून गेले तरी अद्याप तिथे सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. या ग्रा. पं. वर शासनाने प्रशासक नेमले असून निवडून आलेले सदस्य नसल्यामुळे या ग्रामपचायतीचा विकास ठप्प झाला आहे. Gram Panchayat elections postponed

गुहागर तालुक्यातील वेळंब, चिंद्रावळे, वेलदूर, अंजनवेल व परचुरी या पाच ग्रामपचायतीची मुदत एप्रिल २० २१ ला संपली आहे. मुदत संपल्यानंतर या ग्रा. पं. गुहागर पंचायत समितीचे अधिकारी यांची प्रशासक म्हणून शासनाने नियुक्त्ती केली आहे. या नियुक्तीला सुमारे दिड वर्ष होत आले. तरीही निवडणूका लागलेल्या नाहीत. जिल्हा प्रशासनाने निवडणूका घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आला.  हे आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूका घेण्यात येऊ नयेत अशी मागणी वाढू लागली. त्यामुळे मध्यंतरी काही दिवसांपूर्वी जाहिर झालेला निवडणूकीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाला पुन्हा स्थगीत करावा लागला. ग्रा.पं. ची प्रभाग रचना जाहिर होऊन आरक्षणा नुसार सदस्य संख्याही जाहिर झाली आहे. Gram Panchayat elections postponed

त्यानंतर मतदार यादीची अंतीम मंजुरी होणे फक्त शिल्लक आहे. परंतू तरीही सतत पडणारा पाऊस व आगामी काळातला गणेशोत्सव झाल्यानंतरच या निवडणूका घेण्यात येण्याचे संकेत मिळाले आहेत. गेली दिड वर्ष ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच वा सदस्य नसल्यामुळे केवळ प्रशासक व ग्रामसेवक हे कधीतरी कारभाराचा आढावा घेतात. त्यामुळे ग्राम स्तरावर विकासाची अनेक कामे ठप्प झाली आहेत. जबाबदारी कोण घेणार ही भावना सरकारी कर्मचारी यांची असल्यामुळे ग्राम पातळीवर वर्ष दिड वर्ष अनेक महत्वाचे निर्णय प्रलंबीत आहेत. शासनाच्या महत्चाच्या पंधराव्या वित्त आयोगाची कामे प्रलंबीत आहेत. त्यामुळे काही ग्रा. पं. मधून जागरूक ग्रामस्थांनी ग्रा.पं. च्या निवडणुका त्वरीत घेण्याची मागणी शासनाकडे सातत्याने केली आहे. Gram Panchayat elections postponed

गुहागर तावुक्यातील वेळंब, परचुरी, चिंद्रावळे, वेलदूर व अंजनवेल या पाच ग्रा. पं. बरोबरच मुदत संपत आलेल्या आणखी २१ ग्रा. पं. च्या ही निवडणूका एकत्रच होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आरे, आवरे असोरे, आबलोली, कोतळूक, कौंढर काळसूर, खोडदे, चिखली, जानवळे, झोंबडी, धोपावे, पाली, पाटपन्हाळे, पांगारी तर्फे हवेली, पोमेंडी, मढाळ, वरवेली, वडद, साखरी त्रिशूळ, हेदवी व जांभारी या २१ ग्रामपचायतीचा समावेश आहे. Gram Panchayat elections postponed

Tags: electionsGram Panchayat elections postponedGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.