• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुंडावळ्या बांधूनच नवरदेवाने केले मतदान

by Ganesh Dhanawade
December 18, 2022
in Guhagar
208 2
0
Gram Panchayat Elections

तरुणाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मुंडावळ्या बांधून थेट मतदानाचा अधिकार

408
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष मतदान पार पडले. आपला मतदानाचा अधिकार बजावणे हे लोकशाहीमध्ये महत्वाचे आहे. हे ओळखून चिखलीमधील एका तरुणाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मुंडावळ्या बांधून थेट मतदानाचा अधिकार बजावला. Gram Panchayat Elections

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

लोकशाहीत मतदानाला खूप मोठे महत्त्व आहे. मतदान जर आपण केलं तर आपण येणाऱ्या सरकारला किंवा सत्तेवर येणाऱ्या राजकारणाला आपल्या मताचे महत्त्व पटवून सांगू शकतो. यासाठीच मतदानाच्या दिवशी आपलं लग्न असताना सुद्धा पहिलं मतदान मग … लग्न असा निश्चय या युवकानी केला आणि तो लग्न मंडपातून थेट मुंडावळ्या बांधून मतदानाला हजर झाला. Gram Panchayat Elections

गुहागर तालुक्यातील चिखली येथील अभिषेक गोयथळे या युवकाचे रविवारी लग्न होते. लग्नाची धामधूम सुरू असताना आपल्याच गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक आहे हे त्याच्या लक्षात आले. त्यासाठी लोकशाहीने दिलेला जो मला अधिकार आहे तो अधिकार बजावण्यासाठी त्यांनी प्रथम लग्नाच्या आधी मतदानाला महत्त्व दिले. अभिषेकने बजावलेल्या मतदानाच्या कर्तव्याचे आज संपूर्ण गुहागर तालुक्यात कौतुक होत आहे. Gram Panchayat Elections

Tags: Gram Panchayat ElectionsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share163SendTweet102
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.