गुहागर ; एकच ग्रामपंचायत बिनविरोध ; 52 जागांसाठी 83 उमेदवार
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील अंजनवेल, वेलदूर, चिंद्रावले, वेळंब व परचुरी या पाच ग्रामपंचयतीच्या निवडणूकीसाठी 13 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत सदस्यांच्या 47 जागांसाठी 72 इच्छुकांनी अर्ज दाखल केले तर सरपंच पदाच्या 5 जागांसाठी 11 उमेदवारांना अर्ज भरले आहेत. परचुरीतील ग्रामस्थांनी जनतेतून थेट निवडून द्यायच्या सरपंचासह 7 ग्रामपंचायत सदस्यांना बिनविरोध निवडून दिले आहे. वेळंब ग्रामपंचायतमध्यये 9 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. फक्त सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. Gram Panchayat Elections 2022
अंजनवेल ग्रामपंचायतमध्ये 11 जागांसाठी 22 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये सरपंच पदासाठी नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री असे आरक्षण असून यासाठी 3 अर्ज दाखल झाले आहेत. वेलदूर ग्रामपंचायतमध्ये 11 जागांसाठी 13 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये सरपंच पदासाठी नामाप्र स्त्री आरक्षण असून यासाठी 2 अर्ज दाखल झाले आहेत. चिंद्रावळे ग्रामपंचायतमध्ये 9 जागांसाठी 21 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये सरपंच पदासाठी नामाप्र स्त्री आरक्षण असून 2 अर्ज दाखल झाले आहेत. वेळंब ग्रामपंचायतमध्ये 9 जागांसाठी 9 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून हि ग्रा. पं. बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे. मात्र सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून त्यासाठी 2 अर्ज दाखल झाले आहेत. परचुरी ग्रामपंचायतमध्ये 7 जागांसाठी 7 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून हि ग्रा. पं. बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे. सरपंच पद हे सर्वसाधारण माहिलेसाठी आरक्षीत झाले असून त्यासाठी एकच अर्ज आल्याने ही जागाही बिनविरोध होणार आहे. Gram Panchayat Elections 2022