• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अंजनवेल व वेलदूर येथे जोरदार संघर्ष

by Ganesh Dhanawade
October 1, 2022
in Politics
17 0
0
Gram Panchayat Elections

Gram Panchayat Election in Guhagar

33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वेळंब, परचुरी बिनविरोध तर चिंद्रावळे सरपंच बिनविरोध

गुहागर, ता.01 : तालुक्यातील सार्वत्रिक ग्रा. पं. निवडणुकीत वेळंब व परचुरी या ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांसह सरपंच निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर चिंद्रावळे ग्रा. पं. चे सरपंच पद ही बिनविरोध झाले आहे. मात्र, अंजनवेल व वेलदूर या दोन मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांसह सरपंच पदासाठी निवडणूक अटळ आहे. तर अनेक ठिकाणी अटीतटीचा सामना होणार आहे. Gram Panchayat Elections

गुहागर तालुक्यातील वेळंब व परचुरी या दोन ग्रा. पं. मध्ये निवडणुक बिनविरोध झाली आहे. वेळंब येथे तीन प्रभागासाठी नऊ उमेदवार उभे राहिले होते. त्यांच्या विरोधी कुणीही नामांकन न भरल्यामुळे त्यांची उमेदवारी बिनविरोध झाली आहे. त्यांना गावातर्फे पाठिंबा देण्यात आला. सरपंच पदासाठी खुल्या वर्गातून तिघींनी अर्ज भरले होते. त्यापैकी दोघींनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे समिक्षा बारगोडे सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आल्या आहेत. परचुरी ग्रा.पं. च्या तीन प्रभागासाठी एकूण सात उमेदवार निवडून घायचे होते. ग्रामस्थांनी एकत्र बसून हे सात उमेदवार निश्चित केले व त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. हे सर्व उमेदवार वैध ठरल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. त्यानंतर सरपंच पदावर सौ. प्रतिक्षा प्रदीप भुवड यांना निवडण्यात आले. त्याचप्रमाणे उपसरपंच पदावर अशोक भुवड व संदिप डाफळे यांना संधी देण्याचे एकमताने ठरविण्यात आले. Gram Panchayat Elections

गुहागर तालुक्यातील मोठी ग्रा. पं. असलेल्या वेलदूर व अंजनवेल ग्रा. पं. च्या प्रत्येकी ११ जागांसाठी मोठी अटीतटीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंजनवेल ग्रामपचायतीच्या चार प्रभागामध्ये ११ सदस्यांसाठी तेरा अर्ज दाखल झाले आहेत. सरपंच पदासाठी ही दोन उमेवार रिंगणात आहेत. वेलदूर ग्रामपंचायतीमध्ये एकाच जागेसाठी निवडणूक होणार असून त्यासाठी बारा उमेदवार उभे आहेत. तर सरपंच पदासाठी दोन उमेदवार उभे आहेत. चिंद्रावळे ग्रा. पं. मध्ये नऊ पैकी आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत तर एका जागेसाठी दोन उमेदवार उभे आहेत. असे असले तरी सरपंच पद मात्र बिनविरोध झाले आहे. Gram Panchayat Elections

Tags: Gram Panchayat ElectionsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.