मतमोजणीचा क्रम निवडणूक विभागाने केला प्रसिद्ध
गुहागर, ता. 19 : गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी मंगळवारी (ता.20) तहसीलदार कार्यालय परिसरात होणार आहे. सकाळी 9.00 वा. मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणी कोणत्या ग्रामपंचायतीनुसार होणार त्याचा क्रम निवडणूक विभागाने आज प्रसिद्ध केला आहे. Gram Panchayat counting of votes
मंगळवारी, ता. 20 सकाळी 9.00 वाजता आबलोली ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर हेदवी, पांगारी तर्फे हवेली, कौंढर काळसूर, धोपावे, कोतळूक, वरवेली, पाटपन्हाळे, खोडदे, पोमेंडी, झोंबडी, चिखली, आरे वाकी पिंपळवट आणि सर्वात शेवटी जानवळे ग्रामपंचायतीची मतमोजणी होईल. मंगळवारी दुपारी 12.00 वाजता मतमोजणीची सर्व प्रक्रिया संपेल. असे नियोजन करण्यात आले आहे. Gram Panchayat counting of votes
यावेळी तहसील कार्यालय परिसरात कोणालाही वाहने उभी करता येणार नाहीत. त्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्याच ठिकाणी वाहने उभी करून पोलिसांना सहकार्य करावे. तसेच मतमोजणी कक्षात ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल. निवडणूकीच्या आचार संहितेचे पालन ग्रामस्थांनी करावे. कायदा व सुव्यवस्था अडचणीत येईल असे कोणतेही वर्तन करु नये. असे आवाहन तहसीलदार कार्यालया कडून करण्यात आले आहे. Gram Panchayat counting of votes