गुहागर, ता. 20 : अंजनवेल आरजीपीपीएल येथील मैत्री क्लबमध्ये बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये प्री-स्कूल व प्री- प्रायमरीच्या लहान मुलांसाठी पदवीदान दिन समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला आरजीपीपीएल मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.एस. के. तकेले, संजना महिला समिती अध्यक्ष सौ.सीमा तकेले, आरजीपीपीएल ऑपरेशन आणि व्यवस्थापन एजीएम श्री व सौ. अशोक सरकार, एजीएम,एचआर श्री. स्नेहासीस भट्टाचार्यां, सौ. टीना भट्टाचार्यांजी, ग्रामीण पाणी पुरवठा अभियंता मंदार छत्रे, सौ. अनुरूपा चटर्जी आणि पालक उपस्थिती होते. Graduation Day at Bal Bharati Public School
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुरजीत चटर्जी यांनी केला. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा केला जातो, याचे विवरण आपल्या प्रास्ताविकातून सादर केले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.एस.के.तकेले यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे कौतुक केले. Graduation Day at Bal Bharati Public School


शाळेतील शिक्षकांच्या परिश्रमामुळे रंगीबेरंगी वेशभूषेत गाणी व नृत्य सादर करणाऱ्या मुलांना टाळ्यांच्या कडकडाटाची भरभरून दाद मिळाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेले गाणे व विविध राज्याच्या वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी रॅम्प वॉक करून पालकांना आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या समारंभात विद्यार्थ्यांना गाऊन व कॅप परिधान करून व पदव्या स्वरूपात प्रमाणपत्र देऊन विधीवत गौरविण्यात आले. अनेक पालकांनी शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांसंदर्भातील त्यांच्या कामगिरीबद्दलचे भरभरून कौतुक करणारे अभिप्राय दिले. Graduation Day at Bal Bharati Public School
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाल भारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुरजित च̆टर्जी, प्री- स्कूलच्या शिक्षिका सौ. धनश्री बावधनकर, प्रायमरीच्या सौ. प्राची कळगूटकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक व विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. Graduation Day at Bal Bharati Public School