गुहागर, ता. 19 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरमध्ये (Maharshi Parashuram College of Engineering, Velaneshwar) पदवी प्रदान सोहळा नुकताच महाविद्यालयाच्या नाना फडणवीस सभागृह मध्ये संपन्न झाला. यंदाचे हे सातवे वर्ष होते. महाविद्यालयातील मेकॅनिकल (Mechanical), इलेक्ट्रिकल (Electrical), इंस्टूमेंटेशन (Instrumentation), इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन (Electronic and Telecommunication) आणि स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) या शाखांमधील गुणवंत विद्यार्थांना पदवी प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार या पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले. Graduation Ceremony of Velaneshwar College
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रशांत पटवर्धन (अध्यक्ष- फेडरेशन ऑफ रत्नागिरी जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्स) यांनी प्रतिपादन केले की, या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक शिक्षणाबरोबरच एक आदर्श अभियांत्रिकी बनण्याची पात्रता व कौशल्य निर्माण केल्याचा मला आनंद वाटत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थांनी एक जबाबदार नागरिक बनून राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान देण्याचे आवाहन केले. यावेळी विद्या प्रसारक मंडळाच्या परंपरेनुसार विद्यार्थांना पुणेरी पगडी, उपरणे व विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. Graduation Ceremony of Velaneshwar College
कार्यक्रमाचे समन्वयक परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा.नंदकिशोर चौगुले यांनी काम पाहिले. यावेळी विद्या प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी अभय मराठे, जेष्ठ शास्त्रज्ञ समितीचे सदस्य सुधाकर आगरकर, जिंदाल उद्योग समूहाचे सदस्य अनिल ददीच, प्रसाद वैद्य तसेच महाविद्यालयाच्या विविध विभागाचे विभागप्रमुख, उपप्राचार्य प्रा.अविनाश पवार, प्राचार्य डॉ.नरेंद्र सोनी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गणेश दिवे यांनी केले. Graduation Ceremony of Velaneshwar College
देशाच्या प्रगतीसाठी असमाधानी रहा; कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर आजच्या तरुणांनी दिवस रात्र आपआपल्या क्षेत्रात सर्वोच्च देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी कष्ट, शिक्षण, नवनवीन संशोधन करून देश वेडे होऊन देशप्रेमी झाले पाहिजे. देश बदलासाठी बैचेन, असमाधानी, जिद्द बाळगली पाहिजे. जो चांगला फसवतो, तो चांगला व्यापारी होतो ही चुकीची समज आहे. त्यामुळे तरुणांनी चारित्र्यवान बनले पाहिजे. Graduation Ceremony of Velaneshwar College