गुहागर, ता.18 : शहरातील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिरची विद्यार्थिनी कु. आर्या मंदार गोयथळे हिचा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम रत्नागिरी येथील वि. दा. सावरकर नाट्यगृहत पार पडला. तिने स्कॉलरशिप परीक्षेत 89.3३ टक्के गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला होता. तर गुहागर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्यामुळे गुहागर तालुक्यातून सर्वच स्तरातून आर्या हीचे अभिनंदन करण्यात येत आहे. Goythale honored by Minister Samant


भारत देशाचा अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर येथे सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आर्या गोयथळे तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, सीईओ इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग उपस्थित होते. Goythale honored by Minister Samant

