मुख्यमंत्री शिंदे, मंत्रीमंडळ बैठकीत तातडीने निर्णय घेऊ
मुंबई, दि. 26 : रत्नागिरी येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय Govt. Medical College Ratnagiri उभारण्यात येणार आहे. यासाठीचा सुधारित प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत सादर करावा. असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले.
Govt. Medical College Ratnagiri
रत्नागिरी शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालय, महिलांचे रुग्णालय आणि मनोरुग्णालय एकत्र असलेल्या परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान सलग 20 एकर जागा असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जागा निश्चित करुन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबतची कार्यवाही करावी. वैद्यकीय महाविद्यालय उभारताना या जागेचे सर्वेक्षण करण्यात येणार असून वित्त व नियोजन, महसूल आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे अभिप्रायही घेण्यात यावेत. वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव (आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ, तांत्रिक उपलब्धता) तयार करावा. Govt. Medical College Ratnagiri
राज्यामध्ये वैद्यकीय सेवा सुविधांचे जाळे विस्तारत असताना रत्नागिरी येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. त्यामुळेच प्राधान्याने या महाविद्यालय उभारणीबाबतचा सुधारित प्रस्ताव सादर करावा. या शैक्षणिक वर्षांपासून हे महाविद्यालय सुरु करता येईल का, सुरु करायचे झाल्यास कोणती पूर्वतयारी करावी लागेल याचाही विचार होणे गरजचे आहे. असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. Govt. Medical College Ratnagiri
या बैठकीस आमदार उदय सामंत (MLA Uday Samant), मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. Govt. Medical College Ratnagiri