शासनाची स्वयंरोजगारासाठी प्रभावी योजना
गुहागर, ता. 03 : पीएमएफएमई ही शासनाची खूप चांगली योजना असून या योजनेमधून जास्तीत जास्त लोकांना प्रकल्प करून शासनाच्या मदतीने आपला उद्योग उभा करता येणे शक्य आहे. या योजनेमध्ये कृषीमालावर प्रक्रिया करून खाद्य पदार्थ बनवण्याचे सर्व प्रकल्प येतात. ही योजना खाद्य उद्योगांसाठी असून माणसांचे खाद्य व पशुखाद्य तयार करणाऱ्या प्रकल्पांना या योजनेमधून 35% अनुदान (सबसिडी) मिळणार आहे. तसेच DRP म्हणून लाभार्थ्यास सहाय्य केले जाणार आहे. Government’s effective scheme for self-employment

या योजनेमध्ये सर्वांना (पुरुष/महिला/सर्व जाती/धर्म) समान सबसिडी मिळणार आहे. नवीन प्रकल्प करता येतो, तसेच चालू असलेल्या प्रकल्पात वाढही करता येते. सर्व आवश्यक कागदपत्रे दिल्यावर दोन आठवड्याच्या आत तुमच्या प्रकल्पाला मान्यता मिळते व 1 महिन्यात सबसिडी जमा होते. या योजने अंतर्गत DRP म्हणून लाभार्थ्यास खालील प्रकारे सहाय्य केले जात आहे. Government’s effective scheme for self-employment
1. प्रकल्प स्थापनेबाबत मार्गदर्शन
2. लाभार्थ्यांची आवश्यक असलेली सर्व डॉक्युमेंट्स एकत्र करणे व योजनेसाठी फाईल तयार करणे.
3. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे
4. ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करणे
5. बँक कर्ज मिळवण्यासाठी सहाय्य
6. प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर अनुदान प्रस्ताव तयार करून तुमच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची प्रक्रिया करणे.
एकंदरीत योजनेसाठी अर्ज करण्यापासून ते अनुदान मिळवण्यापर्यंत संपूर्ण हँड-होल्डींग सपोर्ट केला जातो. फक्त तुम्हाला बँक लोन करून घेणे येवढेच राहते. सर्वात महत्वाचे म्हणजे PMFME योजनेसाठी हा सर्व सपोर्ट विनामूल्य (फ्री मध्ये) उपलब्ध आहे. असे आवाहन जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांचेकडून करण्यात आले आहे. Government’s effective scheme for self-employment

या प्रकल्पाचे दिग्विजय पाटील यांनी सांगितले की, या योजनेतील अनुदान मिळवून देण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करतो. तसेच या योजनेच्या अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी दिग्विजय पाटील, जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP) PMFME – भारत सरकार, रत्नागिरी जिल्हा, कॉल/व्हॉट्सॲप – 9960044744 यावर संपर्क करावा. जर कॉल उचलला नाही गेला तर कृपया व्हॉट्सॲप मेसेज करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. या योजनेमध्ये कृषीमाला वर प्रक्रिया करून खाद्य पदार्थ बनवण्याचे सर्व प्रकल्प येतात. यामध्ये येणारे प्रकल्पाची नावे पुढीलप्रमाणे, Government’s effective scheme for self-employment
1) काजू प्रक्रिया उद्योग
2) आंबा पल्प निर्मिती उद्योग
3) फणस वेफर्स उद्योग
4) कोकम सरबत / आगुळ निर्मिती
5) करवंद प्रक्रिया उद्योग
6) नारळ प्रक्रिया उद्योग
7) पापड उद्योग
8) पिठाची गिरणी
9) बेकरी उद्योग
10) खवा उद्योग
11) फरसाण उद्योग
12) शेंगदाणा/सोयाबीन/सूर्यफूल/करडी तेल निर्मिती उद्योग (तेलघाना लाकडी/यांत्रिक)
13) चकली / नमाकिन उद्योग
14) सीलबंद पाणि उद्योग
15) लोणचे निर्मिती उद्योग
16) हळद / मसाले निर्मिती उद्योग
17) राइस मिल
18) चटणी – मसाला डंख
19) केळीचे चिप्स निर्मिती उद्योग
20) बिस्किट निर्मिती उद्योग
21) पोहा निर्मिती उद्योग
22) ब्रेड/टोस्ट निर्मिती उद्योग
23) केक निर्मिती उद्योग
24) चॉकलेट निर्मिती उद्योग
25) कोकोनट मिल्क पावडर निर्मिती उद्योग
26) कस्टर्ड पावडर निर्मिती उद्योग
27) दलीया निर्मिती उद्योग
28) डाळमिल
29) एनर्जी ड्रिंक निर्मिती उद्योग
30) पिठाची गिरणी
31) फ्रेंच फ्राय निर्मिती उद्योग
32) फ्रुट ज्युस निर्मिती उद्योग
33) अद्रक – लसुण पेस्ट निर्मिती उद्योग
34) हिंग निर्मिती उद्योग
35) मध निर्मिती उद्योग
36) बर्फाचे तुकडे निर्मिती उद्योग
37) आइस क्रिम कोन निर्मिती उद्योग
38) आयोडिनयुक्त मिठ निर्मिती उद्योग
39) जैम व जेली निर्मिती उद्योग
40) लिंबू शरबत निर्मिती उद्योग
41) नुडल्स/शेवई निर्मिती उद्योग
42) पाम तेल निर्मिती उद्योग
43) पनीर/चिज निर्मिती उद्योग
44) पास्ता निर्मिती उद्योग
45) आलू चिप्स निर्मिती उद्योग
46) राईस ब्रान तेल निर्मिती उद्योग
47) सुगंधित सुपारी निर्मिती उद्योग
48) सोया चन्क निर्मिती उद्योग
49) सोया सॉस निर्मिती उद्योग
50) शुगर कँडी निर्मिती उद्योग
51) सोयाबीन पनीर व सोयाबीन खरमुरे निर्मिती उद्योग
52) इम्लीपल्प निर्मिती उद्योग
53) टोमैटो प्रोसेसिंग उद्योग
54) चेरी(टूटी फृटी)निर्मिती उद्योग
55) विनेगर निर्मिती उद्योग
56) ग्रेप वाईन निर्मिती उद्योग
इ. कृषीमालावर आधारित कोणताही प्रक्रिया उद्योग सुरू करता येणार आहेत, तरी इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
