राष्ट्रगीत ऑप्शनला तर ठराविक समाजातील विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी विशेष जागा
रत्नागिरी, ता. 18 : येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात काही वेळा राष्ट्रगीत ऑप्शनला टाकले जात असल्याचे तसेच ठराविक समाजातील विद्यार्थ्यांना शुक्रवारी प्रार्थनेसाठी विशेष जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आरोप करत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तंत्रनिकेतनच्या प्राचार्याना जाब विचारला. Government Tantraniketan Principal of Ratnagiri’s strange work
हा प्रकार सातत्याने शासकीय तंत्रनिकेतन अर्थात पॉलिटेक्निकमधे घडत असल्याचे माहिती मिळाल्यानंतर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालय गाठले आणि प्राचार्यांची भेट घेऊन काही वीडियो दाखवले. वास्तविक राष्ट्रगीत नेहमी म्हणणे अपेक्षित असताना अनेकदा ते दैनंदिन कामकाजातून वगळले जात असल्याचे निदर्शनास आले तर काही ठराविक समाजातील विद्यार्थ्याना प्रार्थनेसाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याबद्दल जाब विचारला. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले की, या विद्यालयात गणवेश सक्तीच्या नियमांची अंमलबजावणी केवळ हिंदू विद्यार्थ्यांवर होत असून मुस्लिम विद्यार्थ्यांना कोणतेही बंधन नाही. अशा प्रकारची एकतर्फी वागणूक हिंदू विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. Government Tantraniketan Principal of Ratnagiri’s strange work


या मुद्द्यांवर प्राचार्यांना धारेवर धरत कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध नोंदवला. त्यानंतर प्राचार्यांनी दिलगिरी व्यक्त करत, “आता पुढे असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत. सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक दिली जाईल. कोणतेही अनुचित प्रकार त्वरित थांबवले जातील,” अशी ग्वाही दिली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. Government Tantraniketan Principal of Ratnagiri’s strange work