गुहागर, ता. 19 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेतील इयत्ता सातवीचा विद्यार्थी संस्कार कल्पेश रोहिलकर याने भूषविले. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष व व्यासपीठावरील इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी आहार बनवण्यासाठी लागणारे टोप भेटवस्तू म्हणून दिले. Goodwill ceremony at Veldur Navanagar School
यावेळी साई नाटेकर, दक्ष रोहीलकर आरोही रोहीलकर, साई नाईक , अन्वी जांभारकर तर सातवी मधील आर्या नाटेकर व अर्णवी नाटेकर, संस्कार रोहिलकर या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. यानंतर सामाजिक कार्यकर्ते मनोज पावसकर, शिक्षण तज्ञ शंकर कोळथरकर व नवानगरचे माजी सरपंच नंदा शेठ रोहीलकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. सुवर्णा कोळथरकर व विशाखा नाटेकर व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी स्वादिष्ट असे जेवण बनवले. सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. Goodwill ceremony at Veldur Navanagar School


या सदिच्छा कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई कोळथरकर त्याचबरोबर वेलदूर नवानगरचे माजी सरपंच नंदाशेठ रोहिलकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व शिक्षणतज्ञ शंकर कोळथरकर, सामाजिक कार्यकर्ते मनोज पावसकर, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्री मनोज पाटील, उपशिक्षिका अंजली मुद्दमवार, सुषमा गायकवाड, पदवीधर शिक्षिका अफसाना मुल्ला व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या दीपिका वरवटकर, दिपाली रोहीलकर, वंशिका आंबेरकर, सुहानी नाटेकर, प्रियाणी रोहीलकर, सुरक्षा रोहिलकर , दुर्वा कोळथरकर, निशा जाधव, रीना खडपकर, देवयानी कोळथरकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा गायकवाड यांनी केले, प्रास्ताविक अंजली मुद्दमवार व आभार प्रदर्शन अफसाना मुल्ला यांनी केले. Goodwill ceremony at Veldur Navanagar School