गुहागर, ता. 22 : शाळांना सुट्टी लागल्यावर चिमुकल्यांना वेध लागतात ते गावी जाण्याचे. सध्या परीक्षा सुरु असल्या तरी त्यानंतर लागणार्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाण्याचं प्लॅनिंग आतापासूनच झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील परिवहन मंडळही सज्ज झालं असून यंदा गावी जाणार्यांना सरप्राइज देण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे. Good news for ST travelers


एसटी महामंडळ उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना थंडगार प्रवासाचा अनुभव देण्याची तयारी पूर्ण केली आहे. राज्यभरात एकूण 872 वातानुकूलित शिवशाही बसेस उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत. उन्हाळ्यातील प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेऊन एसटी महामंडळाने पुरेशा वातानुकूलित शिवशाही बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. Good news for ST travelers
उन्हाळी सुट्टीदरम्यान मुंबई आणि उपनगरांमधून कोकण तसेच राज्याच्या इतर भागांत जाणार्या चाकरमान्यांचे प्रमाण अधिक असते. एकीकडे रेल्वेने अतिरिक्त सेवा सुरू केली. तरी राज्याच्या ग्रामीण भागात जाण्यासाठी प्रवासी ’लाल परी’ला पसंती देतात. अनेक गावांमध्ये जाण्यासाठी एसटी बसशिवाय इतर पर्यायच नाही अशीही स्थिती आहे. या सार्या गोष्टींचा विचार करुन प्रवाशांचा कल एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर टाकू शकतो, या अनुषंगाने महामंडळाने एप्रिल आणि मे महिन्यात 782 वातानुकूलित शिवशाही बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. Good news for ST travelers