गुहागर, ता.12 : सलग दोन वर्षानंतर यावर्षी झालेल्या गणपती उत्सवात गणेश भक्तांनी दाखविलेल्या प्रचंड उत्साहामुळे व त्यांनी केलेल्या खरेदी मुळे गुहागर तालुक्यातील सर्वच दुकानांमधून खरेदी साठी झुंबड उडाली होती. परिणामी या गणेशोत्सवात व्यापाऱ्यांना खरेखुरे अच्छे दिन अनुभवायला मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. Good day to traders on Ganeshotsav

गुहागर तालुक्याची सर्वात मोठी आर्थिक उलाढाल होत असलेल्या शृंगारतळी या मध्यवर्ती बाजारपेठेत या गणेशोत्सवात मोठी आर्थिक उलाढाल झाली. जानवळे फाटा ते गुहागर कॉलेज पर्यंतच्या सुमारे दिड किलो मिटर पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा ही बाजारपेठ असून सर्व प्रकारच्या वस्तू घाऊक व किरकोळ विक्रीची येथे दुकाने आहेत. सद्या किराणा मालाच्या दुकानातून मॉल टाईप खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल दिसून येत आहे. संपूर्ण दुकानात फिरून आपल्याला हवी ती वस्तू स्वतः जमा करून त्यानंतर पावती करणे ग्राहक पसंत करतात. जानवळे फाट्या समोरील कुणबी ग्राहक भांडार, बँक ऑफ इंडिया खाली शृंगारतळी बाजार व मालाणी यांचा प्रशस्त दुमजली मालाणी मार्ट असे शृंगारतळीत आहेत. या मॉल मध्ये किराणा धान्य वस्तू पासून कपडे, सौंदर्य प्रसाधने, गिफ्ट आयटम असे मोठमोठ्या शहरात असणाऱ्या वस्तू आहेत. ७ ते ८ जणांनी फुलांच्या आकर्षक हारांची दुकाने, मिठाईची दुकाने, चिकन आणि मटण दुकाने, पादत्राणे, पास्टिक वस्तू व कापड दुकाने, मोठी मद्याची दुकाने असून असंख्य हॉटेल आहेत. Good day to traders on Ganeshotsav
हायस्कुल कॉलेज सह अनेक प्रकारचे कोर्स असणारी खाजगी महाविद्यालय शृंगारतळीत असल्याने संपूर्ण गुहागर तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी रोज येत – जात असतात. त्यामुळे या बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते व येणारा प्रत्येक जण काही तरी खरेदी करतो. त्यामुळे ही बाजारपेठ सदानकदा भरलेली दिसते. Good day to traders on Ganeshotsav

मात्र, मागील कोरोना महामारीच्या या व्यापारी पेठेवर विपरीत परिणाम झाला. सर्व प्रकारची वाहतूक बंद असल्यामुळे व बाहेर कुठेही जाण्याची मोठी भिती असल्याने या गर्तेत ही बाजारपेठ अडकली. अनेक छोटी दुकाने बंद करावी लागली. ग्राहकच नसल्याने व्यापाऱ्यांच्या गुंतवणुकीवर मोठा विपरीत परिणाम झाला. परंतू दोन वर्षांच्या या प्रतिकूल परिस्थिती नंतर पहिल्यांदाच आलेल्या निर्बंध मुक्त गणेशोत्सवामुळे व्यापारी मोठ्या तयारीने व्यापारासाठी सज्ज झाले. त्यामुळे मोठ्या मॉल पासून ते छोट्या टप्परी, तसेच रस्त्यावर हात गाडीवर फळे व पूजेचे सामान विकणारे छोटे विक्रेते यांनी या गणपती काळात चांगला व्यवसाय केला. असेच अच्छे दिन या पुढेही येऊ देत अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी व्यापाऱ्यांनी केली आहे. Good day to traders on Ganeshotsav
