रत्नागिरी, ता.12 : दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरचा सुवर्णमहोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, कार्याध्यक्ष सौ. सुमिता भावे, सचिव राजीव गोगटे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर लेले, व्यवस्थापक श्री. आग्रे परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक विनोद नारकर आदी प्रमुख उपस्थित होते. Golden Jubilee of Abhyankar Children’s Temple
१९ जून १९७२ रोजी हे बालकमंदिर सुरू झाले. सुरवातीला काही दिवस शाळा गाडीतळ येथील छोट्या वास्तूत सुरू होती. १९९४/९५ ला तिसऱ्या तुकडीला मान्यता मिळाली. मुलांची संख्या वाढू लागली. त्यामुळे तेथील जागा कमी पडू लागल्याने संस्थेने प्राथमिक शाळेच्या वर्गात बसायला परवानगी दिली. संस्थेतील पदाधिकारी व विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. दाक्षायणी बोपडीकर व शाळेतील बालकमंदिरच्या संकल्पनेतून बालकमंदिरची स्वतंत्र इमारत २००८ मध्ये बांधण्यात आली. शाळेच्या प्रगतीबाबत यावेळी माहिती देण्यात आली. Golden Jubilee of Abhyankar Children’s Temple
या सुवर्णमहोत्सवानिमित्त बालकमंदिरच्या माजी विद्यार्थ्यांनी मनोगतामध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला. निवृत्त मुख्याध्यापिका सौ. रिसबुड, मुख्याध्यापिका सौ. काळे यांच्यासमवेत सर्व शिक्षिका, सेविका यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. Golden Jubilee of Abhyankar Children’s Temple