गुहागर, ता. 27 : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे 18 डिसेंबर रोजी झालेल्या सब ज्युनिअर धनुर्विद्या (आर्चरी) स्पर्धेत इंडियन धनुष्यबाण प्रकारात TWJ आर्चरी अकॅडमी व श्रीमती आर. पी. पी. विद्यालय ज्युनिअर कॉलेज पालशेतचा विद्यार्थी कु. यश सुभाष सावंत याने सुवर्णपदक पटकावले. त्याची 24 ते 26 डिसेंबर या कालावधीत उस्मानाबाद (धाराशिव) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. Gold medal to Yash Sawant in Archery competition
कु. यश सावंत हा विद्यार्थी प्रिय शिक्षक, क्रीडा संघटक व उत्कृष्ट मराठी समालोचक श्री. सुभाष सावंत सर यांचा चिरंजीव आहे. या यशामध्ये मुख्य प्रशिक्षक श्री. ओंकार घाडगे, प्रशिक्षक अभिषेक पालकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल बोलताना यश याने संपूर्ण श्रेय मी TWJ आर्चरी अकॅडमी आणि माझ्या रयत संस्थेच्या पालशेत हायस्कूलचे मुख्याध्यापक मनोज जोगळेकर, क्रीडा शिक्षक श्री. जाधव, श्री. पाटील यांना देईन. या त्याच्या कामगिरीचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालशेत मधील ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी यांनी अभिनंदन केले. Gold medal to Yash Sawant in Archery competition