संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता.18 : तालुक्यातील खोडदे, आबलोली गावचा सूपूत्र आणि नवोदय विद्यालय राजापूर येथील विद्यार्थी कु. अनुज संदेश साळवी याने गोल्ड मेडल पटकावले आहे. तो इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत असून जागतिक मान्यता असलेली वर्ल्ड क्यूबस असोसिएशन या संस्थेमार्फत लिटिल फ्लॉवर स्कूल, कलावुर केरळ राज्यामध्ये घेण्यात आलेल्या एम क्यूबस ओपन 2022 या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पटकावले आहे. या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. Gold Medal to Anuj Salvi


ही जागतिक दर्जाची दुसरी स्पर्धा होती. कमी वेळेमध्ये आणि कमी वयामध्ये यश संपादन करून कु. अनुज याने सर्वांना सुखद धक्का दिला आहे. अनुज याने यासाठी रात्र- दिवस प्रचंड मेहनत आणि कष्ट घेतले आहे. गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर्स सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी, संचालिका सौ. सावी साळवी यांचा अनुज हा सुपूत्र आहे. या स्पर्धेत जम्मू, काश्मिर, दिल्ली, बॕंगलोर, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र येथून अनेक स्पर्धेक सहभागी झाले होते. Gold Medal to Anuj Salvi

