• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुंबई विमानतळावर सोन्याची बिस्किटे केली जप्त

by Manoj Bavdhankar
September 12, 2022
in Bharat
16 0
0
Gold biscuits seized at Mumbai airport
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सीमाशुल्क अधिकाऱ्यांची सुनियोजित कारवाई ; सहा जणांना अटक

मुंबई, ता. 12 : मुंबई विमानतळावर  सीमाशुल्क विभागाने 10 सप्टेंबर 2022 रोजी  एका सुनियोजित कारवाई अंतर्गत सुदानी प्रवाशांकडून 5 कोटी 38 लाख रुपये किमतीचे सोन्याची  12 किलो वजनाची बिस्किटे  जप्त केली. सुदानी प्रवाशांचा हा गट दुबईहून एमिरेट्स फ्लाइट AK-500 ने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेला होता. Gold biscuits seized at Mumbai airport

सुमारे 23 सुदानी लोकांच्या  एका गटाने एकत्र येऊन   कस्टम अधिकाऱ्यांचे लक्ष विचलित  करण्यासाठी  गोंधळ निर्माण करून ग्रीन चॅनल मधून बाहेर पडण्याचा  प्रयत्न केला. सुदानी प्रवाशांनी सीमाशुल्क आगमन क्षेत्रात मुद्दाम गोंधळ घातला तसेच अधिकाऱ्यांसमोर आरडाओरड करून आक्रमक पवित्रा घेतला आणि काही जण मारामारी देखील करू लागले. मात्र सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी हा प्रकार अतिशय व्यावसायिकतेने हाताळला. पुरेशी कुमक घेऊन त्यांनी  या आक्रमक प्रवाशांना आवरलं  आणि परिस्थिती नियंत्रणात  आणली. सीमाशुल्क आगमन क्षेत्रात मुद्दाम गोंधळ निर्माण करून धूर्तपणे सोने घेऊन पलायन करायचा त्यांचा डाव होता. Gold biscuits seized at Mumbai airport

गोंधळ करून  पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या एका प्रवाशाने परिधान केलेल्या खास डिझाइन केलेल्या पट्ट्यात लपवून ठेवलेल्या प्रत्येकी एक किलो वजनाची  12 सोन्याची बिस्किटे  सीमाशुल्क अधिकार्‍यांच्या प्रभावी आणि जलद कारवाईमुळे हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी सीमाशुल्क अधिकाऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणूनबुजून वेगळे वर्तन करणाऱ्या अन्य पाच प्रवाशांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. Gold biscuits seized at Mumbai airport

चौकशीतून असे निष्पन्न झाले की मुंबई विमानतळावर आलेले हे सहा प्रवासी नियोजित कट कारस्थान करून गोंधळ निर्माण करून सोने घेऊन पलायन करणाऱ्या प्रवाशाला मदत करणार होते. या पाच प्रवाशांनी सोने तस्करी करण्याच्या पूर्वकल्पित कटाचा भाग असल्याची कबुली दिली असून ज्या प्रवाशाकडून सोने जप्त करण्यात आले त्याच्यासह त्यांनाही अटक करण्यात आली आहे. या सर्वांना 23.09.2022 पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. Gold biscuits seized at Mumbai airport

याशिवाय तपासणीत अडथळा निर्माण करणाऱ्या इतर सहा प्रवाशांना देखील पकडण्यात आले. मुंबई विमानतळ कार्यालयाच्या, ब्युरो ऑफ इमिग्रेशन, च्या  मदतीने या सहा प्रवाशांना काळ्या यादीत टाकून सुदानला परत पाठवण्यात आले आहे. Gold biscuits seized at Mumbai airport

Tags: Gold biscuits seized at Mumbai airportGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.