गुहागर, ता. 23 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील इयत्ता दहावीमधील विद्यार्थिनी कु. रिया प्रकाश विचारे हिला चतुरंग प्रतिष्ठान तर्फे सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार रविवारी दि. २८ जानेवारी रोजी इंदिरा सांस्कृतिक केंद्र चिपळूण या ठिकाणी वितरीत करण्यात येणार आहे. Godbole Award to Riya Vichare
शिक्षण, कला, क्रीडा, नेतृत्व , वकृत्व, लेखन, अभिव्यक्ती, सदाचरण, आदी अष्टपैलू गुण व विद्यार्थी गुणवत्तेची दखल घेऊन चतुरंग प्रतिष्ठान सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यावर्षी ५३ विद्यालयांनी सहभाग नोंदवून २०७ विद्यार्थ्यांची नोंद पुरस्कार प्रक्रियेसाठी झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयातील इयत्ता दहावीमधील रिया प्रकाश विचारे हिला चतुरंग प्रतिष्ठान सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्याध्यापक व्ही. डी. पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख व ज्येष्ठ शिक्षिका सौ. एस.एस. चव्हाण तसेच शिक्षकवृंद यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. Godbole Award to Riya Vichare