गुहागर, ता. 17 : गुहागर तालुका तेली समाजसेवा संघाच्या वतीने जिल्हास्तरीय तेली प्रीमियर लीग नुकतीच गुहागर पोलीस परेड ग्राउंडवर संपन्न झाली या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून महापुरुष, गुहागरचा खेळाडू व गुहागर तेलीआळीतील रहिवाशी नामवंत व अष्टपैलू खेळाडू सुरज सुरेश रहाटे या तरुण खेळाडूचा सन्मान करण्यात आला. Glory to player Suraj Rahate
सुरज रहाटे याला लहानपणापासूनच ॲथलेटिक व क्रिकेटची आवड होती. क्रिकेट हे त्याच्या आवडीचे क्षेत्र आहे. ऊंच उडी मध्ये त्यानें राज्यस्तरापर्यंत मजल मारली सध्या तो एल अँड टी कंपनीमध्ये जॉब करत असून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याचं नावलौकिक आहे. गुहागर येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये तो कालिका माता, धोपावे संघातून खेळत होता. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता. त्याने केलेले उत्कृष्ट क्षेत्ररक्षण याचमुळे विरुद्ध संघाच्या अनेक धावा तो रोखू शकला होता. अंतिम सामन्यामध्ये देखील चिपळूण इलेव्हन संघाच्या अनेक धावा उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे त्यांनी रोखल्या होत्या. त्यामुळेच त्याचा तेली समाज संघाचे अध्यक्ष प्रकाश झगडे यांच्या हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. Glory to player Suraj Rahate
यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभागीय अध्यक्ष सतीश वैरागी, जयश्री वैरागी, भाजपाचे ओबीसी सेल मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष, उद्योजक संतोषदादा जैतापकर, शिवसेनेचे चिपळूण तालुकाप्रमुख विनोद झगडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक व गोल्डन मॅन वैभव दादा रहाटे, कोंकण विभागीय सचिव चंद्रकांत झगडे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, दिनेश नाचणकर, दत्ताशेठ रहाटे, चिपळूण तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण (बापू )राऊत,कोकण विभागीय महिला अध्यक्ष प्रियंका भोपाळकर, महिला जिल्हाध्यक्ष श्रेयाताई महाडिक, उद्योजक महेश राऊत, गोवर्धन महाडीक,गुहागर ता. अध्यक्ष प्रकाश रहाटे, स्पर्धा प्रमुख व तालुका सचिव प्रवीण रहाटे, सहसचिव गणेश किर्वे, खजिनदार विश्वनाथ रहाटे , सुहास रहाटे, माजी तालुकाध्यक्ष एकनाथ रहाटे, शशिकांत पवार, तेली समाजोन्नती संघ ता. चिपळूण व गुहागर अध्यक्ष नरेंद्र झगडे, नारायण झगडे, महिला तालुकाध्यक्ष दिव्या किर्वे, युवक तालुकाध्यक्ष दिनेश झगडे आदि मान्यवरानी त्याचे विशेष कौतुक केले. Glory to player Suraj Rahate