चिपळूण मिरजोळी येथील दलवाई हायस्कूलला प्रोजेक्टर भेट
गुहागर, ता. 18 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त चिपळूण मिरजोळी येथील दलवाई हायस्कूलला प्रोजेक्टर भेट देण्यात आला. Gift of projector to Prabhakar Arekar on his birthday

श्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर आरेकर यांना सकाळ माध्यम समुहाने आयडॉल ऑफ महाराष्ट्र (चेअरमन) हा पुरस्कार दिला. त्यांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेवून व्यवसायवृध्दीसाठी समाजातील मान्यवरांच्या भेटी गाठी घेणे, गट बैठकांमधुन सभासद संख्या वाढविणे अशी अनेक कामे सुरु केली. सर्व शाखांमध्ये वीज बील भरणा, एटीएम, मनी ट्रान्सफर यासारख्या सेवाही दिल्या जातात. Gift of projector to Prabhakar Arekar on his birthday

या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर, संचालिका सौ. स्मिता आरेकर, दलवाई हायस्कूचे शिक्षक व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. Gift of projector to Prabhakar Arekar on his birthday
