गुहागर, ता. 16 : शृंगारतळी येथील जीवन ज्योती विशेष शाळेला ला. रविंद्र खरे यांच्या माध्यमातून हार्मोनियम आणि ढोलकी भेट स्वरूपात देण्यात आली. बौद्धिकता कमी आणि कमी अधिक प्रमाणात व्यंग असणाऱ्या मुलांच्या जीवनात संगीतातून आनंद निर्माण व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या माध्यमातून हा उपक्रम संपन्न झाला. Gift of harmonium and drum to Jeevan Jyoti School
यावेळी प्रेसिडेंट ला. संतोष वरंडे, सचिव ला. सचिन मुसळे, खजिनदार ला. मनिष खरे, ला. श्यामकांत खातू, श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य ला. सुधाकर कांबळे, ला. विनोद पटेल, मुख्याध्यापिका शिंदे, सचिव अजिंक्य पेडणेकर आदी उपस्थित होते. Gift of harmonium and drum to Jeevan Jyoti School