महर्षी कर्वे संस्थेच्या बीसीए कॉलेजच्या विद्यार्थिनीं कडून
रत्नागिरी, ता.12 : घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए कॉलेजमधील विद्यार्थिनींनी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना शुभेच्छापत्र आणि भारताची प्रतिकृती भेट म्हणून दिली. या अनोख्या उपक्रमाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. Gift of greetings and replicas to Collectors


स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सायकल रॅली, तिरंगा फेरी, पदयात्रा, स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. बीसीए कॉलेजमध्ये विद्यार्थिनींनी हस्तकौशल्यातून शुभेच्छापत्र साकारली आहेत. पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह समाजातील विविध प्रतिष्ठित मान्यवरांना अशी शुभेच्छापत्र वितरित करण्यात येणार आहेत. Gift of greetings and replicas to Collectors


बीसीए कॉलेजमधील विद्यार्थिनी सलोनी वरेकर, सानिका सावंत, सुरभी सावंत, दिया चव्हाण, प्रीती साळवी, ज्ञानदा केळकर, मंजिरी कांबळे आणि प्रा. केतन पाथरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भारतीय स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देणारे व शहीद भगतसिंग यांचा संदेश असणारे शुभेच्छापत्र दिले. तसेच भारताची सुरेख प्रतिकृती भेट म्हणून दिली. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी विद्यार्थिनींनी शुभेच्छा देत शिक्षणाविषयी माहिती घेतली. तसेच करिअर करताना नोकरी की व्यवसाय याचीही विचारणा केली. कॉलेज शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनींनी आपल्या जिल्ह्यासाठी योगदान द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. या वेळी प्रा. पाथरे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाविद्यालयात आयोजित विविध उपक्रमांविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. या उपक्रमाकरिता विद्यार्थिनींना बीसीए कॉलेजच्या प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, प्रकल्प प्रमुख मंदार सावंतदेसाई आणि सर्व संचालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. Gift of greetings and replicas to Collectors