गुहागर, ता. 05 : कुणबी समाजोन्नती संघ,(मुंबई) शाखा ; तालुका गुहागर अंतर्गत “गुहागर गटाची सर्वसाधारण सभा रविवार दि २ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ४ वाजता घेण्यात आली. ही सभा गुहागर शाखेचे माजी अध्यक्ष श्री.अनंतराव साटले यांच्या अध्यक्षतेखाली आणि गुहागर शाखेचे शाखाध्यक्ष श्री.कृष्णा विश्राम वणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गटाचे अध्यक्ष श्री सुरेशजी गिजे, गुहागर शाखेचे सहचिटणीस श्री.शांताराम आग्रे, जेष्ठ कार्यकर्ते, माजी पोलीस निरीक्षक, श्री.रघुनाथ घुमे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुणबी ज्ञातिगृह, वाघे हॉल, परळ,मुंबई – १२ येथे संपन्न झाली. General meeting of Kunbi Samojonnati Sangh concluded


सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे अध्यक्ष श्री. सुरेश गिजे यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन, व गटाच्या कार्यकारणीचे कार्यकर्ते आणि गावा- गावातून आलेल्या मंडळाचे अध्यक्ष, सेक्रेटरी, कार्यकर्ते यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर गटाचे सेक्रेटरी श्री.अनिल भुवड यांनी मागील सर्वसाधारण सभेच्या इतिवृतांतचे वाचन केले व वर्षभरात केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच कुणबी जोडो अभियान संदर्भात केलेल्या कामाचा आढावा सादर केला. General meeting of Kunbi Samojonnati Sangh concluded
शाखाध्यक्ष श्री.कृष्णा वणे साहेब यांनी उपस्थित कुणबी बांधवांना संबोधित करताना “कुणबी समाजाचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र” या संवेदनशील विषयाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या अडचणीची माहिती देऊन आपल्या मातृ संस्थेच्या वतीने तील्लोरी कुणबी समाजाचा डेटा गोळा करण्यासाठी भरावयाच्या फार्म संदर्भात सविस्तरपणे माहिती दिली. तसेच राजकारणात आपल्या समाजाचे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे समाजाचे ज्वलंत विषय सोडविण्यासाठी आपल्याला कोणीच सहकार्य करत नाहीत याची जाणीव करून ही परिस्थिती बदलण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघाच्या आशीर्वादाने आणि कुणबी राजकीय समितीच्या पुढाकाराने नवीन स्थापन झालेल्या “बळी राज सेना” या राजकीय पक्षा विषयी माहिती दिली आणि विविध राजकीय पक्षांत विभागलेल्या समाजातील कार्यकर्त्यांनी यापुढे या नवीन राजकीय पक्षात सक्रिय व्हावे, अशी विनंती केली. संघाकडून आलेल्या सूचनेनुसार तालुक्याची व गटांची आगामी नवीन कार्यकारिणी निवड करणे, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, प्रभात दिनदर्शिका इत्यादींची माहिती दिली. General meeting of Kunbi Samojonnati Sangh concluded


सभागृहात कार्यकर्त्यांनी मांडलेले विचार
श्री. मनोहर घुमे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, गुहागर गटामधील आलेल्या प्रत्येक गावातील मंडळाचे अध्यक्ष, सेक्रेटरी यांचे मंडळाच्या नावासहीत गुहागर गटाच्या दप्तरी नोंदणी ठेवा. “बळीराज सेना” या नवीन पक्ष्याबद्दल माहिती सांगितली.
श्री. चंद्रकांत पारदळे यांनी मी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलो होतो तिथे बळीराज सेनेचे मोठा बँनर पाहीला तेथे कार्यकर्ते बळीराज सेने मार्फत भक्तांना भेटवस्तू वाटप करीत होते. अभिमान वाटला. आपणही सर्व एक होऊन संघटनेला साथ देऊ या.
श्री. सुरेश गिजे गुहागर गटाचे अध्यक्ष यांनी उपस्थितांना धन्यवाद देऊन आतापर्यंत जसे सहकार्य केलेत त्याप्रमाणे पुढेही द्या. आम्हीं काम करीत असताना तुमचे सर्वांचे सहकार्य मोलाचे आहे अशी आशा व्यक्त केली.
श्री.अनंतराव साटले साहेब यांनी ,”गणेश को आपरेटीव्ह सोसायटी” तसेच “गुहागर तालुका कुणबी सहकारी पतसंस्था” आपल्याला कर्ज देण्यासाठी आणि आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आहेत, त्याचा सर्वांनी फायदा घ्या असे सांगितले.
शेवटी समारोप करतानाच गुहागर गटाचे सेक्रेटरी श्री.अनिल भुवड यांनी सर्व कुणबी बांधव आणि उपस्थित मान्यवर यांचे आभार मानले. बरेच वर्षानंतर समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. गुहागर गटाच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला आहे. आम्ही प्रभारी म्हणून काम करीत आहोत. सर्व गावातील कार्यकर्त्यांनी स्वतः च्या ईच्छेने समाजकार्यासाठी पुढाकार घेऊन कार्यकारिणी मध्ये सहभागी व्हावे. General meeting of Kunbi Samojonnati Sangh concluded