गुहागर, ता. 31 : पंचायत समिती गुहागरची आमसभा मंगळवार, दि. 8 सप्टेंबरला सकाळी 11 वा. भंडारी भवन, कै. इंदिरा वासुदेव शेटे सभागृह, किर्तनवाडी रस्ता, गुहागर येथे होणार आहे. ही आमसभा आमदार भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तरी गुहागर तालुकावासीयांनी आमसभेला उपस्थित रहावे. असे आवाहन गटविकास अधिकारी गुहागर यांनी केले आहे. General Meeting of Guhagar on 8th September

पंचायत समितीची आमसभा म्हणजे गावागावातील प्रलंबित विकास कामांमधील अडथळे सोडविण्याचा राजमार्ग असतो. आमसभेमध्ये शासनाच्या प्रत्येक खात्याचा अधिकारी उपस्थित असतो. सामान्य जनतेने दिलेल्या निवेदनाला उत्तर देणे हे संबंधित अधिकाऱ्यांना बंधनकारक असते. एकाच ठिकाणी सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित असल्याने एखाद्या प्रलंबित विकास कामातील अडथळे आमसभेमध्ये चटकन दूर होतात. आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार असल्याने अधिकाऱ्यांना उडवाउडवीची, दिशाभुल करणारी उत्तरे देता येत नाहीत. कारण आमसभेतील प्रत्येक विषयाचा आढावा त्यानंतर थेट आमदार घेतात. त्यामुळे आमसभा म्हणजे दिर्घकाळ चालणारी, शेकडो निवेदनांवर चर्चा होणारी असे चित्र असते. General Meeting of Guhagar on 8th September

मात्र यावर्षी गुहागरच्या आमसभेसाठी केवळ 8 निवेदन पंचायत समितीकडे प्राप्त झाली आहेत. यामधील 4 निवेदने रस्त्यासंदर्भातील, 1 महावितरण, 1 आरोग्य विभाग, 2 कृषी विभागाशी संबंधित आहे. राज्यातील राजकारणामध्ये झालेल्या उलटफेरांमुळे निवेदनांचा दुष्काळ असल्याची चर्चा सध्या गुहागरमध्ये होत आहे. General Meeting of Guhagar on 8th September
