संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 01 : २० व्या रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद ज्युदो स्पर्धा २०२३ या स्पर्धेमध्ये ४० किलो वजनी गटात गुहागर तालुक्यातील तळवली बौध्दवाडीतील कु.गौरव पवार याने प्रथम क्रमांक पटकाविला. ही स्पर्धा गुहागर भंडारी भवन येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील अनेक मुलांनी भाग घेतला होता. गुहागर तालुका ज्युदो असोसीएशन व रत्नागिरी जिल्हा हौशी ज्युदो संघटना यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा पार पडली. Gaurav first in the championship judo competition

स्पर्धा प्रमुख समीर पवार तसेच गुहागर तालुका ज्युदो असोसिएशनच्या अध्यक्षा सोनाली वरंडे व रत्नागिरी जिल्हा हौशी ज्युदो संघटनेचे अध्यक्ष निलेश गोयथळे यांनी ही स्पर्धा पार पाडली. या स्पर्धेत गौरव पवार याला प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देवुन गौरविण्यात आले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातुन तालुक्यातुन व तळवली पचंक्रोशीतुन गौरव पवार यांचे कौतुक केले जात आहे. त्यांच्या यशामागे त्याचे शिक्षक व पालक यांचा मोलाचा वाटा आहे. Gaurav first in the championship judo competition
