• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 August 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवली अंगणवाडीत बालक व पालकांचा स्वागत मेळावा

by Mayuresh Patnakar
August 27, 2026
in Guhagar
40 0
0
Gathering of children and parents at Talavali
78
SHARES
224
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 27 : तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, गुहागर अंतर्गत बीट तळवलीमधील तळवली बौद्धवाडी अंगणवाडी केंद्रात ‘नवचेतना’ व ‘आधारशिला’ उपक्रमांतर्गत बालक व पालकांचा स्वागत मेळावा उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. Gathering of children and parents at Talavali

या कार्यक्रमाचे उद्घाटन एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, गुहागरच्या पर्यवेक्षिका कांचन गुरव यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. प्रारंभी माता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना कांचन गुरव आणि पत्रकार उत्तम पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अंगणवाडीतील बालक व पालकांचे स्वागत करण्यात आले. ‘नवचेतना’ व ‘आधारशिला’ या उपक्रमांची माहिती देताना कांचन गुरव यांनी पूर्व प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व, आरोग्य व स्वच्छता तसेच बालकांचा सामाजिक, मानसिक, शारीरिक, बौद्धिक व भाषिक विकास याबाबत मार्गदर्शन केले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. Gathering of children and parents at Talavali

अंगणवाडी सेविकांच्या वतीने पर्यवेक्षिका कांचन गुरव, पत्रकार उत्तम पवार तसेच पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास तळवली बीटमधील 41 अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस, पालक तसेच गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका मानसी संजय कुळे यांनी केले, तर श्रद्धा बेलवलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. Gathering of children and parents at Talavali

Tags: Gathering of children and parents at TalavaliGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share31SendTweet20
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.