केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
गुहागर, ता. 05 : राज्यातील शासकीय- निमशासकीय अधिकारी कर्मचारी, अधिसंख्य पदावर वर्ग केलेले अधिकारी कर्मचारी यांचे सेवालाभ व वंचित ३३ जमातीच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्यूमन ने राज्यस्तरीय भव्य मेळावा व अधिसंख्य पदाचा तांत्रिक खंड क्षमापित करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतल्यामुळे नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे रविवार ६ ऑक्टोबर २०२४ रोजी दु.१२ वा राज्यस्तरीय भव्य मेळावा व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती ऑफ्रोह चे प्रसिध्दीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी दिली आहे. Gathering and felicitation ceremony of ‘Ofroh’
या भव्य मेळाव्याचे उद्घाटक म्हणून रस्ते वाहतूक व राजमार्ग केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी तर सत्कारमूर्ती व प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. गोपीनाथजी पडळकर,आ. विकासही कुंभारे, आ.प्रवीणजी दटके, आ.कृष्णाजी खोपडे, आ.मोहनजी मते, कामठीचे आ.टेकचंदजी सावरकर, रामटेके आ.आशीषजी जैस्वाल, उमरेडचे माजी आमदार राजू पारवे तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ऑफ्रोह चे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर हे भूषविणार आहेत. Gathering and felicitation ceremony of ‘Ofroh’


प्रमुख उपस्थिती म्हणून ऑफ्रोह चे निमंत्रक माजी उपसचिव बी.के.हेडाऊ,कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते, राज्य उपाध्यक्ष डॉ. देवराम नंदनवार, प्रभारी महासचिव, डॉ. दिपक केदार, माजी महासचिव रूपेश पाल, सहसचिव डॉ. अनंत पाटिल, राज्य कोषाध्यक्ष मनिष पंचगाम, ऑफ्रोह महिला आघाडी राज्याध्यक्ष अनघा वैद्य, उपाध्यक्षा प्रिया रामटेककर, भारती धुमाळ, सामाजिक कार्यकर्ता व विभागीय अध्यक्ष प्रा. सुरेश पाटकर, सामाजिक कार्यकर्ता दिपक देवघरे, जगदिश खापेकर, ऑफ्रोह चे कायदे सल्लागार अँड. अनिल ढोले, मनोज जुनोनकर राज्य कार्यकारिणी सदस्य नरेश खापरे, व ऑफ्रोह महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे. Gathering and felicitation ceremony of ‘Ofroh’
महाराष्ट्रातील 33 अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीतील कर्मचारी व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन ऑफ्रोहचे राज्य प्रसिध्दीप्रमुख गजेंद्र पौनीकर व आयोजक ऑफ्रोहचे, नागपूर जिल्हाध्यक्ष दामोधर खडगी, ऑफ्रोह नागपूर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.आशाताई वाघ यांनी केले आहे. Gathering and felicitation ceremony of ‘Ofroh’