ग्रा.पं. पाटपन्हाळे जनजागृतीला नागरिकांचा ठेंगा; कचरा फेकण्यासाठी मॉर्निवॉकचे निमित्त
गुहागर, ता. 07 : तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळीच्या वेशीवर पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. यापूर्वी टाकलेल्या कचऱ्याची विल्हेवाट पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने लावून ध्वनीक्षेपाद्वारे जनजागृती करुनसुध्दा वेशीवर कचरा आणून टाकला जात आहे. विशेष करुन मॉर्निवॉकचे निमित्त साधून हा कचरा काही सुशिक्षित नागरिकांकडूनच टाकला जात असल्याची चर्चा असून ग्रा.पं.च्या स्वच्छता जनजागृतीला त्यांच्याकडून एकप्रकारे ठेंगा दाखविण्यात येत असल्याचे पहायला मिळत आहे. Garbage piled up at the gate of Sringartali
प्रत्येक गाव, त्यानंतर तालुका, राज्य हागणदारी मुक्त झाले पाहिजे म्हणून अभियान राबविण्यात आले. त्यानतंर घनकचरा व्यवस्थापनावर गेल्या वर्षभरापासून पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासन काम पाहत आहे. उघडयावर कचरा टाकू नये, कायदेशीर कारवाई केली जाईल अशा कितीही ध्वनीप्रक्षेपण झाले तरी आज गावांच्या वेशीबाहेर रस्त्यावर उघडयावर कचऱ्याचे साम्राज्य पहावयास मिळत आहे. ही एकप्रकारे मानसिक विकृतीचे दर्शन पहावयास मिळत आहे. या टाकलेल्या कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्लास्टीक पिशव्या, कपड्यांचे तुकडे यांचा यामध्ये समावेश असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. Garbage piled up at the gate of Sringartali
शासनाने आज घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत प्रत्येक व्यक्तीवर ३४० रूपये निधी खर्च करण्याचे ठरविले आहे. स्वच्छता व पाण्यासाठी १५ वा वित्त आयोगातून ६० टक्के निधी खर्ची पाडावयाचा आहे. यासाठी घनकचरा व्यवस्थापनामध्ये जिल्हास्तरावरून नीला पॉलिकॅप व ऑल इंडिया या दोन कंपन्यांना ठेका देण्यात आला आहे. प्रत्येक गावाचा घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गंत डीपीआर तयार करून सार्वजनिक शोष खड्डे, वैयक्तिक शोषखड्डे, सार्वजनिक कुंडया, कचरा संकलन इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या सायकलही दिली आहे. पोस्टर व बॅनरबाजीने स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. स्पिकरवरून कचरा उघडयावर टाकू नये, कारवाई केली जाईल असा संदेशही पोहच होत आहे. परंतु सोशल मिडीयावर झटपट माहीती मिळवून आपली बुद्धीमत्ता दाखविणारा सुजाण नागरीकाला मात्र अजूनही उघडयावर कचरा टाकू नये हे अंगवळणी पडत नाही. Garbage piled up at the gate of Sringartali
सुरूवातीच्या काळात उघडयावर शौचास बसू नये म्हणून हगणदारमुक्त अभियान राबविले गेले. तर आता उघडयावर कचरा टाकू नये म्हणून घनकचरा अभियान राबताना दिसून येत आहे. कचरा टाकण्यासाठी मॉर्निंगवॉकचा फंडा वेशीवरच्या कचऱ्याने चिपळूण-गुहागर मार्गावरील शृंगारतळी, मार्गताम्हाने-देवघर या गावांना डोकेदुखी ठरली आहे. बाजारपेठेत तेथील ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेसाठी राबत आहे. मात्र तेच व्यवसायीक खुलेआम वेशीबाहेर कचरा फेकताना आढळून येतात. तर काहींनी रात्रीचे प्लास्टिक पिशव्यांमध्ये साठवून ठेवलेला कचरा पहाटेच्या मॉर्निंगवॉकच्या वेळी वेशीबाहेर टाकण्याची नामी शक्कल लढविली आहे. Garbage piled up at the gate of Sringartali
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गाव पातळीवर कचराकुंड्यांचेही वाटप ग्रामपंचायतीकडून केले जाते. आपल्या घरातील कचरा आपणच जमा करून त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही नागरिकांची असते. मात्र, काहीजण या जबाबदारीला गांभीर्याने न घेता कचऱ्याने भरलेली पिशवी रस्त्याने जाताना त्याच्या कडेला किंवा नदी-नाल्यांमध्ये टाकतात. बहुसंख्य ग्रामपंचायतींना कचरा संकलित करणारी घंटागाडी नसते. त्यामुळे बाजारपेठांमधील कचरा संकलित करण्याचा विषय सहसा येत नाही. मात्र, संबंधित गावांच्या बाजारपेठेतील मुख्यत्वे करुन भाजी व्यापारी, मासळी, मटण विक्रेते दिवसभराची घाण आणून गावच्या वेशीवर रस्त्यालगतच आणून टाकतात. दररोज एकाच जागेवर कचरा टाकण्याची सवय झाल्याने काही ठिकाणे कचऱ्याचा डेपोच बनले आहे. Garbage piled up at the gate of Sringartali
पाटपन्हाळे गावच्या शृंगारतळी हद्दीत कचरा जमा करणारी घंटागाडी रोज फिरत असते. कित्येक नागरिक हातात कचरापेटी घेऊन घंटागाडीत कचरा टाकण्यासाठी रस्त्यावर उभे असतात आणि कचरा घंटगाडीत टाकतात. असे असताना त्याच हद्दीत जानवळे फाटादरम्यान, रस्त्यालगत असे कचऱ्याचे ढीग कसे काय तयार होतात, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. संबंधित हद्दीतील ग्रामपंचायतीनी या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन नागरिकांना सूचना कराव्यात, अशी मागणी होत आहे. Garbage piled up at the gate of Sringartali
नाक्यांवरील पिंजरे कचऱ्याने तुंबलेले
महामार्गावरील गावांच्या ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक ठिकाणी नागरिक, प्रवासी यांच्याकडून कचरा टाकण्यासाठी तारेचे पिंजरे बनवून ते मुख्य नाका, बाजारपेठ अशा ठिकाणी ठेवण्यात आल्याचे दिसून येतात. मात्र, कित्येक गावांचे पिंजरे कचऱ्याने तुंबलेले पहायला मिळतात. या पिंजऱ्यामध्ये पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टीकची पाकिटे यांचा इतका कचरा असतो की या पिंजऱ्यातील कचरा कधीच बाहेर काढलेला नसल्याचे यावरुन ओळखता येते. कित्येक पिंजऱ्यांना झाडांच्या वेली, वाळवीने घेरलेले असते. सदर कचरा संकलनाची जबाबदारीही एका एजन्सीकडे दिली असून सदर एजन्सीने वेळेत लक्ष देणे गरजेचे आहे. Garbage piled up at the gate of Sringartali
परिसर स्वच्छ ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी
गावांच्या सीमेवर रस्त्यालगत कचरा आणून टाकला जातो. जे नागरिक अशापध्दतीची कृती करत आहेत ते सार्वजनिक आरोग्याला हानिकारक आहे. घनकचरा व्यवस्थापन गावांमध्ये असताना कचरा कुंडीतच टाकणे महत्वाचे आहे. आम्ही स्वतः पाटपन्हाळे हद्दीवरील कचऱ्याची विल्हेवाट लावली मात्र, अजूनही काही नागरिक कचरा आणून टाकत आहेत. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. -विजय तेलगडे, सरपंच पाटपन्हाळे Garbage piled up at the gate of Sringartali