• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संपुर्ण महाराष्ट्रात भाजपाचे गाव चलो अभियान

by Manoj Bavdhankar
February 8, 2024
in Guhagar
163 1
0
Gaon Chalo Abhiyan of BJP in Maharashtra
320
SHARES
913
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुक्यातील १४० बुथमध्ये भाजप पदाधिकारी करणार निवासी प्रवास

गुहागर, ता. 08 : भारतीय जनता पार्टीकडून सध्या गाव चलो अभियान सुरू आहे. गुहागर तालुक्यातील प्रत्येक बुथवर हे अभियान यशस्वीपणे राबवून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला. Gaon Chalo Abhiyan of BJP in Maharashtra

भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली शृंगारतळी येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, आजी माजी पदाधिकारी बैठक घेण्यात आली. यामध्ये गाव चलो अभियानांतर्गत १४० बुथवरचे निवासी प्रवासाचे नियोजन करण्यात आले. प्रवासी कार्यकर्ते हे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती, विविध महत्वपूर्ण निर्णय, संघटनात्मक कामकाज आदी विषयांची माहिती देऊन कामकाज करणार आहेत. Gaon Chalo Abhiyan of BJP in Maharashtra

गुहागर तालुक्याचे नियोजन करण्यासाठी झालेल्या बैठकीत भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शिगवण, पंचायत राज व ग्रामविकास सेल जिल्हा संयोजक यशवंत बाईत, तालुका सरचिटणीस सचिन ओक, रविंद्र अवेरे, दिनेश बागकर, कोषाध्यक्ष संतोष मावळणकर, माजी सभापती दिप्ती असगोलकर, पंचायत समिती माजी सदस्य विजय भुवड, अरूण रहाटे, तालुका उपाध्यक्ष मुबीन ठाकूर, रघुनाथ घाणेकर, मंगेश रांगळे, विजय मिशाळ, श्रद्धा घाडे, चिटणीस कृष्णा गोरीवले, ज्योती परचुरे, वैशाली मावळणकर, भगवान कदम आदींसह पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. Gaon Chalo Abhiyan of BJP in Maharashtra

Tags: Gaon Chalo Abhiyan of BJP in MaharashtraGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share128SendTweet80
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.