• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला

by Guhagar News
June 26, 2023
in Travel
108 1
0
Ganpatipule beach open for tourists
213
SHARES
608
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 26 :  रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंभू तीर्थक्षेत्र असणाऱ्या गणपतीपुळे तीर्थक्षेत्रातील गेले काही दिवस बिपोरजॉय वादळामुळे समुद्रकिनारा भाविक पर्यटकांना बंद करण्यात आला होता. आता शुक्रवारपासून हा समुद्रकिनारा पुन्हा एकदा खुला करण्यात आला आहे. Ganpatipule beach open for tourists

सुमारे पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या बिपोरजॉय चक्रीवादळामुळे गणपतीपुळे समुद्र चौपाटीवर अचानक सुमारे ६ ते ७ फुटांची उंचीची महाभयानक लाट आल्याने अनेक व्यावसायिकांचे साहित्य समुद्रामध्ये वाहून गेले. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही पर्यटकांनाही थोड्याफार प्रमाणात दुखापत झाली. त्या दिवसापासून गणपतीपुळे समुद्रात जाण्यासाठी पर्यटकांना पूर्णपणे बंदी करण्यात आली होती. वादळाचे संकट आता संपले असल्याने हा समुद्रकिनारा पुन्हा एकदा खुला करण्यात आला आहे. Ganpatipule beach open for tourists

असे असले तरी समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असून अनेक ठिकाणी समुद्रात चाळ (खड्डे) पडलेले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी समुद्राच्या खोलवर पाण्यात जाऊ नये, असे आवाहन गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. या समुद्रकिनाऱ्यावर गणपतीपुळे ग्रामपंचायतीतर्फे जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. मात्र पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. ऐन व्यवसायाच्या दिवसात हे संकट ओढवल्याने पर्यटकांनी गणपतीपुळेकडे पाठ फिरवली. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. Ganpatipule beach open for tourists

Tags: Ganpatipule beachGanpatipule beach open for touristsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगणपतीपुळे समुद्रकिनारागुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share85SendTweet53
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.