मुख्यमंत्री शिंदेंचा अभिनव उपक्रम; उकडीचे मोदकही दिले भेट
दिल्ली, ता. 09 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने नवी दिल्लीत विविध देशांच्या राजदूतांना गणेशोत्सवानिमित गणेशमूर्ती आणि उकडीचे मोदक भेट देण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे दिल्लीस्थित जनसंपर्क अधिकारी अभिषेक जाधव यांनी विविध देशांच्या दूतावासांना प्रतिकात्मक श्रीगणेशाची मूर्ती भेट दिली. अनेक देशाच्या राजदूतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे आभार मानले आहेत. Ganeshotsav in Embassies
गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. विविध देशांचे सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून सर्व देशांचे राजदूत नवी दिल्लीत कार्यरत असतात. गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे उकडीचे मोदक आणि श्रीगणेशाची मूर्ती अशी भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वतीने विविध देशांच्या राजदूतांना देण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे दिल्लीस्थित जनसंपर्क अधिकारी अभिषेक जाधव यांनी विविध देशांच्या राजदूतांची भेट घेतली. एकमेकांच्या संस्कृतीची देवाणघेवाण व्हावी, महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख साऱ्या जगाला व्हावी, म्हणून हा उपक्रम केल्याचे समजते. Ganeshotsav in Embassies
डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वेन, मेक्सिकोचे राजदूत फेडेरिको सेलस, कुवेतचे राजदूत मेशाल मुस्तफा अलशेमाली, लॅटव्हियाचे राजदूत ज्युरीस बोन, लिथुआनियाच्या राजदूत डायना मिकेव्हीसीएनी यांनी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राच्या जनतेप्रती आभार व्हिडिओच्या माध्यमातून आभार व्यक्त केले आहेत. तसेच अन्य सर्व राजदूतांनी मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अभिषेक जाधव यांच्याजवळ आभारसंवेदना प्रकट केल्या आहेत. Ganeshotsav in Embassies