गुहागर, ता. 27 : श्री देव स्वयंभू गजानन देवस्थान ट्रस्ट तवसाळ ग्रामस्थ मंडळाच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे माघी गणेशोत्सव श्रींच्या मंदिरात शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व भक्तगणांनी सर्व कार्यक्रमास आपल्या कुटुंबासमवेत उपस्थित राहावे. अशी विनंती मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. माघी गणेश जयंती निमित्त यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Ganesha Festival at Tavasal
बुधवार दि. 29 रोजी रात्रौ 9.30 वाजता ग्रंथाचे मंदिरात आगमन, स्थानिक भजन, ग्रंथाचे वाचन व आरती. गुरुवार दि. 30 रोजी सकाळी 7 ते रात्रौ 7 वाजता ग्रंथाचे वाचन, स्थानिक भजन व आरती. रात्रौ 8 ते 10 वाजता मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, शुक्रवार दि. 31 रोजी सकाळी 7 ते रात्रौ 9 वाजता ग्रंथाचे वाचन, स्थानिक भजन व आरती. शनिवार दि. 01 रोजी सकाळी 9.30 ते 10.30 वाजता दिंडीचे मंदिरात आगमन (वारी) सकाळी 10.30 ते 11.30 वाजता स्थानिक भजन, सकाळी 11.30 ते 12.30 वाजता, श्रीं चा जन्मोत्सव सोहळा, दुपारी 1 ते 3 वाजता महाप्रसाद, सायं. 6.30 ते 7.30 वाजता दिंडीचे मंदिरात आगमन (वारी) सायं. 7.30 ते 10.30 वाजता श्रीं च्या रथाची मिरवणूक, रात्रौ 11 वाजता निमंत्रितांचे सुश्राव्य भजने व पहाटे श्रीं चा प्रसाद, रविवार दि. 02 रोजी रात्रौ 9 वाजता ग्रंथाचे वाचन व समाप्ती, रात्रौ 10 वाजता मंदिरातून दिंडी (वारी), सोमवार दि. 03 रोजी सकाळी 10.30 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 12 वाजता तीर्थप्रसाद, दुपारी 3 वाजता महिलांचा हळदीकुंकू समारंभ, रात्रौ 8 वाजता स्थानिक भजन, रात्रौ 10.30 वाजता श्री गजानन नाट्य मंडळ तवसाळच्या वतीने मदन राजवाडकर लिखित धमाल विनोदी 2 अंकी नाटक “लव्ह लव्हर जिंदाबाद” सादर करण्यात येणार आहे. Ganesha Festival at Tavasal