• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रस्ता दुरुस्तीसाठी प्रमोद गांधीनी केले आर्थिक सहकार्य

by Ganesh Dhanawade
August 23, 2023
in Guhagar
158 2
0
Gandhi gave financial support for road repairs

मनसे गुहागर ता. संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा दोडवली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करताना माजी सभापती दत्ताराम निकम

310
SHARES
887
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मनसे  ता. संपर्क अध्यक्ष गांधी यांचा दोडवली ग्रामस्थांतर्फे सत्कार

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील नरवण वाघांबे दोडवली मासू रस्त्याची दुरावस्था झाली होती. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा दोडवली ग्रामस्थांच्या वतीने दोडवली शाळा येथे सत्कार करण्यात आला. Gandhi gave financial support for road repairs

नरवण वाघांबे दोडवली मासू रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे झाले होते. रस्त्याला जागोजागी खड्डे पडलेले असल्याने रस्त्यावरून प्रवास करण्यास वाहनधारक तयार होत नव्हते. आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी सुद्धा वाहनचालक तयार होत नव्हते. अशी रस्त्याची स्थिती झाली होती. येथील नागरिकांनी अनेकवेळा शासनदरबारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे अर्ज, विनंत्या निवेदने दिली. नागरिकांना कुणीही न्याय देऊ शकले नाहीत. अखेर ग्रामस्थांनी मनसे गुहागर ता. संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्याकडे केली. अखेर प्रमोद गांधी यांनी पंचायत समिती, जि.प. ग्रामपंचायत यांच्याकडे रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी केली. Gandhi gave financial support for road repairs

पण कोणीही यासाठी निधी देवु शकले नाहीत. ग्रामस्थांची होणारी अडचण लक्षात घेता प्रमोद गांधीनी स्वखर्चाने जेसीबी, पाण्याचा टँकर, डम्पर, रोलर यासाठी आर्थिक सहकार्य केले होते. तसेच अंगमेहनत करणाऱ्या ग्रामस्थांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. ग्रामस्थांनीही श्रमदानाने या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी मेहनत केली होती. या रस्त्यासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या मनसे गुहागर ता. संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा दोडवली गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला. Gandhi gave financial support for road repairs

यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर, तालुका सचिव श्रीराम विचारे, माजी सभापती दत्ताराम निकम, संतोष रामगडे, सहसंपर्क अध्यक्ष सुरेंद्र निकम, संजय हुमणे, अशोक कांबळे, शाखाध्यक्ष सचिन निकम, अंकुश निकम, प्रमोद निकम, प्रशांत साटले, अमित खोडेकर, नितीन कारकर, जितेंद्र साळवी, शहराध्यक्ष नवनाथ साखरकर, तसेच दोडवली गावातील ग्रामस्थ मनसे सैनिक, शिक्षक उपस्थित होते. Gandhi gave financial support for road repairs

Tags: Gandhi gave financial support for road repairsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share124SendTweet78
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.