गुहागर, ता. 28 : परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन भूमीत वसलेले कोकण म्हणजे स्वर्ग जणू भाद्रपद शुद्ध चतुर्थीचे वेध लागते गणरायाच्या आगमनाची कोकणची अनेक वर्षांपासून परंपरा जपत कामानिमित्ताने चाकरमानी मुंबई, पुणे अशा अनेक ठिकाणाहून कोकणात येतात. Ganapati immersion ceremony at Tavasal
गणरायाच्या स्वागतासाठी तयारी निसर्ग रम्य मखर, आरास सजावट करत वेगवेगळ्या विषयांवर चलचित्र, देखावा साकारत सामाजिक संदेश त्यातून दिला जातो. गणरायाची प्रतिष्ठापना करून ढोळकी, झांज, टाळ, मृदुंग अशा वाद्यांच्या साथीने आरती करण्यात येते. दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी निमित्ताने वाडीतील मुख्य ठिकाणी जागर म्हणून जाकडी नृत्य (बाला डांन्स) पुरुष वर्ग आणि महिला यांचा नाच होतो. पुढे गौरीईचे आगमन पारंपरिक पद्धतीने पाण्याचं मुख्य प्रवाहाजवळ (पाणवठ्या शेजारी) विधीवत पुजा करुन गौराईला विनवणी फेर्यांची गाणी फेर धरला जातो. घरी आल्यावर सोबत आणलेल्या तेरडा, सोनवळी फुल झाडे यांची लाकडी खुर्चीला मुखवटा बांधून नऊ वारी साडी नेसून, तर हातापायाची गौवराईचा साज शृंगार सजावट करण्यात येते. आणि गौराई पुजण्यात येते. सोबत पाठिराखा शंख्रोबा पहायला मिळतो. दुसऱ्या दिवशी होवसा म्हणून सुपात काडकाडीच्या पानावर पाणाचा विडा, सुपारी, खोबरे, फळ असा भरला जातो. मग सुहासिनी गौरीला होवसून नंतर ते वान सगळ्यांना देतात. तसेच रात्री उशिरापर्यंत प्रत्येक घरात गौरी गणपती जागर उत्सव म्हणून जाकडी न्यृत्य (बाला डांन्स) महिलांचा टिपरी नाच वरती ठेका धरुन मनोरंजन करत रात्र जागवली जाते. Ganapati immersion ceremony at Tavasal
खास वैशिष्ट्ये म्हणजे कोकणात गावातील विसर्जन मिरवणूकीत पोलिस बंदोबस्त करावा लागत नाही. ढोल ताशांच्या बॅन्जोवर बेधुंद होऊन तालावर नाचत गाजत मिरवणूक काढली जाते. शेवटी जाकडी नृत्य व आरती करत बाप्पाला निरोप देण्यात आला. गणराया तुझ्या आगमनाने कोकणची भूमी प्रसन्न झाली तुला निरोप घेताना अश्रू अनावर झाले म्हणून साद घालत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या भक्ती भावाने निरोप घेत समारोह झाला. Ganapati immersion ceremony at Tavasal