रंगमंदिर गुहागर येथे संगीत आणि सामाजिक नाट्य
गुहागर, ता 27 : तालुक्यातील रंग मंदिर गुहागर येथे श्री गजानन नाट्य समाज देवपाट यांच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त दि. 27 व 29 रोजी विविध संगीत आणि सामाजिक नाट्य प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. या शतकपूर्ती सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन म्हणून तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे, नगराध्यक्ष, श्री. राजेश बेंडल उपस्थित राहणार आहेत. Gajanan Natya Samaj Centenary Celebration

आज शुक्रवार, दि. 27 रोजी रात्री 10 वा. रंग मंदिर गुहागर येथे श्री गजानन नाट्य समाज देवपाट यांच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त संगीतनाट्य ‘संगीत संत कान्होपात्रा’ लेखक ना. वी. कुलकर्णी व दिग्दर्शक विवेक जोशी, याला संगीत मार्गदर्शन राजाभाऊ शेंबेकर करणार आहेत. तसेच रविवार, दि. २९ रोजी रात्री १० वा. दिग्दर्शक, श्री. उदय सावरकर व लेखक, वसंत सबनीस यांचे सामाजिक नाटक ‘अप्पाजींची सेक्रेटरी’ सादर करण्यात येणार आहे. Gajanan Natya Samaj Centenary Celebration
