महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे विविधांगी दर्शन
गुहागर, ता. 18 : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे विविधांगी दर्शन घडविणाऱ्या ‘सागा ऑफ मराठा एम्पायर’ कार्यक्रमाने ‘जी-२०’ बैठकीच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींचे मन जिंकले. शिववंदना, मर्दानी खेळ अन् शिवराज्याभिषेक गीताने कार्यक्रमात परमोच्च बिंदू गाठला. G20 Conference
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘जी २०’ परिषदेनिमित्त विविध देशातून आलेल्या प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर ढोल-लेझीमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी ढोल, लेझीम, टाळहाती घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाद दिली. G20 Conference

या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त रितेश कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. G20 Conference
भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्सच्या कलाकारांनी ‘सागा ऑफ मराठा एम्पायर’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन कलेद्वारे घडविले. त्यानंतर अखेरीस ढोल, लेझीम ताशाचे सादरीकरण झाले आणि परदेशी पाहुणेही यात सामील झाले. जी-२० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वागत केले. पालकमंत्र्यांनी काही प्रतिनिधींशी संवाद साधला. पुणे शहराने पाहुण्यांच्या स्वागतासाठी चांगली तयारी केली आहे. पाहुण्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी व्यक्त केलेला आनंद लक्षात घेता पुणेकरांचे प्रयत्न सफल झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. G20 Conference
