शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊ या; तालुकाप्रमुख कनगुटकर
गुहागर, ता. 05 : राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत गुहागर नगरपंचायतीमधील 6 कामांना 1 कोटी 16 लाख 55 हजार, 588 निधीची तांत्रिक मान्यता दिली आहे. या व्यतिरिक्त गुहागर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री भरघोस निधी देणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर व शहरप्रमुख निलेश मोरे यांनी दिली. दरम्यान, तालुक्यासाठी आलेल्या निधीबाबत सद्या तालुक्यात चिपळूण येथून खोट्या पत्रांचा संचार सुरू आहे. तालुक्यातील जनतेने त्यावर विश्वास ठेऊ नये व कोणत्याही भूल थापाना बळी पडू नये, असे आवाहन तालुकाप्रमुख श्री. कनगुटकर यांनी केले आहे. Funding by the Guardian Minister for Guhagar City
शिवसेना तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, शहर प्रमुख निलेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. गुहागर शहरातील विकास कामांना निधी मिळावा म्हणून राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना विनंती केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी गुहागर शहरातील कामांना महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानातून तांत्रिक मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा केला. 1 कोटी 16 लाख 55 हजार, 588 निधीची उपलब्धता करुन दिली. यामुळे शहराच्या विकासाला अधिक गती मिळणार असून यापुढे शहराच्या नियोजित विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन पर्यटन वाढीबरोबरच सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन यावेळी केले. Funding by the Guardian Minister for Guhagar City
या विकास कामांमध्ये दुर्गादेवीवाडी डांगळे होम ते धारेपर्यंत रस्ता डांबरीकरण व खडीकरण करणेसाठी 22 लाख 91 हजार 588 रुपये, भंडारी भवन समोरील भागाला पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी 24 लाख, गुहागर असगोली मुख्य रस्ता ते संदीप घाडे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण 29 लाख 10 हजार 417 रुपये, खालचापाट लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील पाखाडी बांधण्यासाठी 16 लाख, 37 हजार, 774 रुपये, गणपती विसर्जन पाखाडी बांधण्यासाठी 8 लाख 77 हजार 977 रुपये, 16 हजार, 520 रुपये आणि गुहागर बाग पाचमाड रस्त्यावरील दत्त मंदिराला संरक्षक भिंत बांधण्यासाठी 15 लाख, 21 हजार, 312 रुपये या कामांचा समावेश आहे. Funding by the Guardian Minister for Guhagar City


गुहागर तालुक्यासाठी दोन कोटी दहा लाख 50 हजार रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यासाठी युवासेना जिल्हा सचिव अमरदीप परचुरे, युवासेना तालुकाप्रमुख रोहन भोसले, युवा सेना उपतालुकाप्रमुख मुन्ना तावडे, उप तालुकाप्रमुख राजेश धामणसकर, उप तालुकाप्रमुख सुभाष काजोळकर, ऊप तालुकाप्रमुख महेश जामसुतकर, गुहागर संघटक प्रल्हाद विचारे, समन्वयक नारायण गुरव, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर शिके॔, उप तालुकाप्रमुख सुशील उर्फ बबलू आग्रे, गुहागर नगरपंचायतीच्या नगरसेविका स्नेहा भागडे, वैशाली मालप, मृणाल गोयथळे, भाग्यलक्ष्मी कानडे, मनाली सांगळे, स्नेहा सांगळे, शिवसेना कार्यकर्ते राकेश गावडे, राकेश साखरकर, दत्तात्रय जांगळी आदींनी प्रयत्न केल्याचे तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांनी सांगितले. Funding by the Guardian Minister for Guhagar City