गुहागर तालुक्यातील कामांसाठी मंजूर
गुहागर, ता. 27 : माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष केदार साठे, जिल्हा नियोजन समिती सदस्य, भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा मधून गुहागर तालुक्यातील २२ कामांसाठी १ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. Fund sanctioned for works in Guhagar Taluk
गुहागर विधानसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, जिल्हा नियोजन समिती सदस्य, भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या मागणीनुसार व पाठपुराव्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा सन २०२३/२४ ग्रामपंचायतींना जन सुविधासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत गुहागर तालुक्यातील २४ कामांसाठी १ कोटी ९० लाख रूपयांच्या निधी मंजूर केला आहे. Fund sanctioned for works in Guhagar Taluk
यामध्ये झोंबडी मुख्य रस्ता ते ग्रामदेवता मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण १० लाख, उमराठ जांगलेश्वर मंदिर ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १० लाख, शीर कुंभारवाडी केळीचे पाणी ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण १० लाख, पालपेणे शाळा नंबर २ ते फरार बाबा मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण १० लाख, साखरी त्रिशुळ सुतारवाडी स्टॉप ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण १० लाख, कोतळूक उदमेवाडी सुरेश आरेकर घर ते वसंत सकपाळ घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, कौंढर काळसूर जोयशीवाडी साई मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, तवसाळ खुर्द स्मशानभूमी बाधणे ५ लाख, मासू भातगाव मुख्य रस्ता ते आवरे घाणेकरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, आबलोली काजुर्ली मुख्य रस्ता ते खोडदे पुढची निवातेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, नरवण मुख्य रस्ता ते पंधरवणे स्मशानभूमी रस्ता खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, कुडली रेवसाबंदर हातीसकर घर ते संतोष रामचंद्र पावरी कुडी पर्यंत नवीन रस्ता तयार करणे ५ लाख, काताळे ग्रामपंचायत पुल ते बारस्करवाडी रस्ता डांबरीकरण करणे ५ लाख, कुडली माटलवाडी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तयार करणे ५ लाख, तवसाळ तांबडवाडी फाटा ते बाबरवाडी दिलिप गावकर घर रस्ता डांबरीकरण करणे ५ लाख, मळण ग्रामपंचायत इमारत बांधणे २० लाख, तवसाळ तांबड कुरटेवाडी एस. टी. स्टॉप ते दिपक लक्ष्मण हुमणे घरापर्यंत नवीन रस्ता तयार करणे ५ लाख, वेळंब पांगारी वीरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १० लाख, पांगारी तर्फे हवेली भुरकुंडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १० लाख या कामांचा समावेश आहे. Fund sanctioned for works in Guhagar Taluk
भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे यांनी माजी आमदार डॉ विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः व जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या मागणीनुसार वरील सर्व कामांना महायुतीच्या सरकारमार्फत पालकमंत्री उदय सामंत यांनी निधी मंजूर करून दिल्याबद्दल पालकमंत्री यांचे आभार मानले. तसेच उर्वरीत विकासकामे भाजपाच्या महायुतीच्या सरकार मार्फत मंजूर होणार असल्याचे सांगितले. Fund sanctioned for works in Guhagar Taluk