मुंबई, ता. 21 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यासह सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय समन्वयक (तेल उद्योग) मिहीर जोशी यांच्या माध्यमातून जनतेला आश्वासन दिले आहे की, पेट्रोल, डिझेल आणि द्रवीकृत पेट्रोलियम गॅस (एलपीजी) यासारख्या आवश्यक पेट्रोलियम उत्पादनांची उपलब्धता संपूर्ण महाराष्ट्रात सामान्य आणि अखंडितपणे सुरू आहे. Fuel supply resumes in Maharashtra
टर्मिनल्स, डेपो, एलपीजी बॉटलिंग प्लांट आणि किरकोळ विक्री केंद्रे या सर्व पुरवठा वाहिन्या कार्यक्षमतेने सुरू असल्यामुळे, संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण पुरवठ्याची स्थिती, स्थिर आणि पुरेशी आहे. निर्धारित सुरक्षा आणि कार्यप्रणालीच्या नियमांनुसार, इंधनाच्या साठ्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे आणि सर्व ठिकाणी इंधन भरण्याची प्रक्रिया कोणत्याही निर्बंधांशिवाय सुरळीतपणे सुरू आहे. Fuel supply resumes in Maharashtra

संपूर्ण पुरवठा साखळीत पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, ग्राहकांची खरी मागणी कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी त्याचे सातत्याने पुनर्भरण केले जात आहे. घरगुती ग्राहकांना एलपीजीचा पुरवठाही सामान्यपणे सुरू असून राज्यभरात वितरण सुरळीतपणे सुरू आहे. Fuel supply resumes in Maharashtra
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी (ओएमसी) लोकांना आवाहन केले आहे की, त्यांनी घाबरून खरेदी करणे टाळावे. तेल विपणन कंपन्यांनी आवाहन केले आहे की, नागरिकांनी इंधनाच्या उपलब्धतेबाबत अचूक आणि सत्यापित माहितीसाठी केवळ कंपन्या अथवा सरकारी प्राधिकरणांनी जारी केलेल्या अधिकृत महितीवरच विश्वास ठेवावा. Fuel supply resumes in Maharashtra