तालुका निहाय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकांचा सिलसिला
गुहागर, ता. 06 : आगामी लोकसभा निवडणुका चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत . विधानसभेच्या निवडणुका आत्तापासून साधारण वर्षभराच्या आत पार पडणार आहेत. नुकत्याच लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालामुळे भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचे सर्व प्रदेश पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्ष यांची बैठक नागपूर मध्ये घेतली. या बैठकी नंतर सर्वच जिल्हाध्यक्षाना दिलेल्या सूचनेप्रमाणे कोकणातही भाजपने मोठ्या प्रमाणात बैठकांचे सत्र चालवले आहे. Front building by BJP in Lok Sabha constituency
या प्रक्रियेमध्ये रायगड लोकसभा मतदासंघांत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, रायगड लोकसभा संयोजक तथा पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील, गुहागर विधानसभा मतदार संघ निवडणूक प्रमुख माजी आमदार डॉ.विनय नातू, दापोली विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख तथा उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष केदार साठे काम बघत आहेत. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील रत्नागिरी जिल्ह्यातील भागात प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष केदार साठे, राजेश सावंत, माजी आमदार बाळ माने, सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख आदी नेते त्याचबरोबर स्थानिक मंडळ अध्यक्ष व पक्षाचे पदाधिकारी सहभागी होत आहेत. दुसरीकडे पदवीधर मतदार संघ नोंदणीचा कार्यक्रमही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्यामध्ये अग्रक्रमाने राबवला गेला. नोंदणीची मुदत संपली असून जिल्ह्यातून सर्वाधिक नोंदणी भाजपा कार्यकर्त्यांकडून केली गेली असल्याचा दावा भाजपा चे पदाधिकारी करत आहेत. Front building by BJP in Lok Sabha constituency
तसेच नुकतीच गुहागर मध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाची एक महत्वाची बैठक पार पडली. यात प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, रायगड लोकसभा संयोजक तथा पेण चे माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी आमदार विनय नातू, जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी मार्गदर्शन केले. अशा रीतीने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी रोज बैठकांचा झंजावात चालू आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. Front building by BJP in Lok Sabha constituency